आपले केस सुंदर, त्वचा स्वच्छ असावी असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत केसांची वाढ खुंटणे, चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे, त्वचेवरचे डाग या समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत.(Hair and skin care) चुकीच्या खाण्यापिण्यामुळे, वाढते प्रदूषण, मानसिक ताण, झोपेची कमतरता आणि चुकीच्या उत्पादनांमुळे केसांना आणि त्वचेला योग्य पोषण मिळत नाही.(simple hair care tips at home) सतत बदलणारे वातावरण आणि हवामानाचा आपल्या केसांसह त्वचेवर परिणाम होतो. (glowing skin and hair growth tips)
आपण चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी रोज किमान दोन वेळा तरी तो धुतो.(best natural remedy for pimples) पण आंघोळीच्या वेळी केलेला छोटासा बदल केस आणि त्वचेसाठी जादू ठरु शकतो. या वेळी त्वचेचे छिद्र उघडे असतात. शरीरातील रक्ताभिसरण अधिक सक्रिय असते.(hair growth in one month naturally) योग्य पद्धतीने निगा राखल्यास केवळ बाह्य रूप सुधारत नाही, तर आतून आरोग्यदायी चमक देण्याचे काम करते.
नवरात्रीसारख्या सणाच्या दिवसांत स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत विशेष जागरूक होतात. या दिवसांत उपवास, फराळी पदार्थ आणि नृत्य-गरबा यांच्या धामधुमीत त्वचेची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण थकवा, धूळ आणि मेकअपमुळे त्वचेला योग्य स्वच्छता आणि केसांना योग्य पोषण न मिळाल्यास त्यांचा नैसर्गिक तेज हरवते. अशावेळी आंघोळीनंतर केलेला एक साधा-सोपा उपाय आपल्या त्वचेचे आणि केसांचे रुप पालटू शकते.
आंघोळ केल्यानंतर आपल्याला चेहरा आणि केस बर्फाच्या पाण्यात भिजावावे लागतील. या पाण्यात आपला चेहरा काही सेकंदांसाठी बुडवा. यानंतर आठवड्यातून एकदा केस धुताना १० ते १५ सेकंदांसाठी बर्फाच्या पाण्यात भिजवा. यामुळे चेहऱ्यासह केसांशी संबंधित समस्या कमी होतील.
बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्याने ओपन पोअर्स बंद होतात. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा मऊ- चमकदार दिसतो. यामुळे सैल त्वचा घट्ट होण्यास देखील मदत होते. बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्याने डोळे आणि चेहऱ्यावरील सूज कमी होते. यामुळे रक्तप्रवाह वाढून नैसर्गिक चमक येते.
थंड पाण्यात केस भिजवल्याने क्यूटिकल्स बंद होतात. यामुळे केस अधिक मऊ आणि चमकदार दिसतात. कोरडे केस कमी होतात. थंड पाण्यामुळे टाळूचे रक्ताभिसरण वाढते. केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केसगळती कमी होते.