केस कोरडे, फ्रिजी झाले असतील तर विंचरताना खूपच गळतात. केसांमध्ये गुंता होण्याचं कारण कमकुवत केस असू शकतं. सतत केसांमध्ये गुंता होत असतील तर जास्त प्रमाणात केस तुटतात. वेळीच केसांचा कोरडेपणा दूर केला नाही तर टक्कल पडण्याचीही भिती असते. थंडीच्या दिवसांत तुमचेही केस खूपच ड्राय झाले असतील तर हा घरगुती हेअर पॅक लावून तुम्ही शायनी, दाट केस मिळवू शकता. हा केमिकल फ्री हेअर पॅक तयार करणं खूपच सोपं आहे. (Hair Gets Tangled A Lot While Combing Apply This Hair Pack To Make Hair Sily Shiny)
हा हेअर पॅक कसा बनवायचा?
हा घरगुती हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक पिकलेलं केळी, १ मोठा चमचा मध हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी केळी बारीक करून घ्या. त्यात मध घाला. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित करून हेअर पॅकप्रमाणे याचा वापर करा.
१ वाटी तांदळाच्या पिठाचा करा जाळीदार, क्रिस्पी डोसा; तांदूळ न दळता न आंबवता झटपट करा
हेअर पॅक कसा लावावा?
हा हेअर पॅक लावून तुम्ही केसांना फ्रिज फ्री बनवू शकता. हा पॅक वापरणं एकदम सोपं आहे. केसांच्या मुळांपासून ते लांबीपर्यंत हा पॅक लावा. हलक्या हातानं मसाजही करू शकता. जवळपास अर्धा तास असंच लावून राहू द्या. नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवून घ्या. केस धुण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. हा हेअर पॅक वापरून तुमचे केस सिल्की, शायनी आणि दाट होतील. केळी आणि मधाचं मिश्रण केसांसाठी गुणकारी ठरते. एका आठवडयात केसांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. (Ref)
केस कंगव्यात अडकू नये म्हणून काय करावे?
शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर कंडिशनिंग नक्की करा. यामुळे केस मऊ होतात आणि विंचरताना अडकत नाहीत.
ओले केस खूपच नाजूक असतात ते ओले असताना विंचरल्यास जास्त तुटतात आणि गुंता वाढतो. केस नैसर्गिकरित्या सुकू द्या. थोडे ओले असतानाच मोठ्या दातांच्या कंगव्यानं विंचरा.
केस धुताना शाम्पूत 'हा' पदार्थ मिसळा; केस मुळापासून होतील दाट-केस गळण्याचं प्रमाण एका धुण्यात घटेल
केस पुसण्यासाठी जाड टॉवेलऐवजी मऊ सूती कापड किंवा मायक्रो फायबर टॉवेल वापरा. केस रगडून पुसू नका.
गुंता काढण्यासाठी नेहमी मोठ्या दातांचा लाकडी कंगवा वापरा किंवा प्लास्टीकचा जाड कंगवा वापरा. बारीक दातांचा कंगवा वापरणं टाळा.
