Lokmat Sakhi >Beauty > रोज खा 'हे' लाल फळ! केसांसाठी जणू संजीवनी, केस इतके दिसतील सुंदर की सगळे विचारतील सिक्रेट

रोज खा 'हे' लाल फळ! केसांसाठी जणू संजीवनी, केस इतके दिसतील सुंदर की सगळे विचारतील सिक्रेट

Hair falls issue: Home remedy for strong shiny hair: Best fruit for hair growth:आहारात काही बदल केल्यास केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 12:36 IST2025-07-25T12:36:10+5:302025-07-25T12:36:54+5:30

Hair falls issue: Home remedy for strong shiny hair: Best fruit for hair growth:आहारात काही बदल केल्यास केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होईल.

Hair falls issue drink beet and hibiscus flower drink Best fruit for hair growth Home remedy for strong shiny hair | रोज खा 'हे' लाल फळ! केसांसाठी जणू संजीवनी, केस इतके दिसतील सुंदर की सगळे विचारतील सिक्रेट

रोज खा 'हे' लाल फळ! केसांसाठी जणू संजीवनी, केस इतके दिसतील सुंदर की सगळे विचारतील सिक्रेट

सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला स्वत:कडे फारसं लक्ष देता येत नाही.(Hair Care Tips) प्रदूषण, चुकीचा आहार, ताण-तणाव यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(Hair falls issue) केसगळती ही सध्या अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. केसगळतीची समस्या सामान्य वाटत असली तरी तिचा परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर होत असतो.  (Home remedy for strong shiny hair)
पावसाळ्यात केस गळतीची समस्या ही अनेकांमध्ये पाहायला मिळते. ऋतू बदलला की, त्याचा आपल्या केसांवर परिणाम होतो.(drink for hair falls) ही समस्या सामान्य वाटत असली तरी याकडे दुर्लक्ष केल्यास अधिक प्रमाणात वाढते. केसगळती थांबवण्यासाठी आपण महागडे तेल आणि शाम्पू वापरतो. केमिकल उत्पादनामुळे केसगळती अधिक प्रमाणात वाढते. ज्यामुळे केसांचे नुकसान होते.(How to stop hair falls) अशावेळी आहारात काही बदल केल्यास केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होईल. 

वय पंचविस पण दिसताय चाळिशीच्या, ओपन पोर्समुळे चेहरा खराब? १ सोपी ट्रिक, महिनाभरात दिसेल फरक

जर आपल्याला केसगळतीची समस्या टाळायची असेल तर आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या उद्भवते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांनी केसगळती रोखण्यासाठी लाल पेय पिण्याचे सुचवले. त्या म्हणतात हे पेय प्यायल्याने केस इतके वाढतील की आपल्याला सांभाळणं कठीण होईल. 

पेय बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

बीट, सुकलेल्या जास्वंदीची फुले पाने आणि केळी लागतील. हे पेय बनवण्यासाठी सगळ्यात आधी बीट सोलून चिरुन घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी उकळवा. त्यात जास्वंदीची सुकलेली फुले आणि चिरलेले बीट घाला. हे पाणी लाल होईपर्यंत ढवळा. आता पाणी थंड झाल्यानंतर पाण्यासहित बीट, जास्वंदीची फुले आणि केळी घालून त्याचा ज्यूस तयार करा. 


जास्वंदीची फुले केसांना मजबूत करतात. तसेच केसातील कोंडा काढून टाकतात. यात असणारे अमीनो आम्ल आणि व्हिटॅमिन सी टाळूला पोषण देते. यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. बीट केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केसगळती थांबते. केसांना जाड आणि चमकदार होण्यास मदत होते. बीटामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना मुळांपासून मजबूत करतात.
 

Web Title: Hair falls issue drink beet and hibiscus flower drink Best fruit for hair growth Home remedy for strong shiny hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.