Lokmat Sakhi >Beauty > ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

Hair growth tips : जर तुम्हालाही केसगळतीची समस्या नेहमीच होत असेल तर यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. ज्याद्वारे तुमच्या केसगळतीच काय केसांच्या इतरही समस्या झटक्यात दूर होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:11 IST2024-12-14T11:10:19+5:302024-12-14T11:11:07+5:30

Hair growth tips : जर तुम्हालाही केसगळतीची समस्या नेहमीच होत असेल तर यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. ज्याद्वारे तुमच्या केसगळतीच काय केसांच्या इतरही समस्या झटक्यात दूर होतील.

Hair Fall : Use onion juice this way to reduce hair loss | ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

Hair growth tips : सध्या केसगळती ही एक अशी समस्या आहे ज्यामुले महिलाच काय पुरूषही हैराण आहेत. खासकरून हिवाळ्यात तर ही समस्या अधिकच वाढते. जर तुम्हालाही केसगळतीची समस्या नेहमीच होत असेल तर यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. ज्याद्वारे तुमच्या केसगळतीच काय केसांच्या इतरही समस्या झटक्यात दूर होतील. हा उपाय म्हणजे कांद्याच रस. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय नॅचरल असल्याने याचे कोणते साइड इफेक्ट्सही नाहीत. अशात जाणून घेऊ केसगळती, कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रसाचा कसा करावा वापर.

दही आणि कांद्याचा रस

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत राहण्यास मदत मिळते. अशात कांद्याच्या रसासोबत दही जर डोक्याच्या त्वचेवर लावलं तर केसगळतीची समस्या काही दिवसात दूर होईल. सोबतच कोंड्याची समस्याही दूर होईल.

कोरफड आणि कांद्याचा रस

त्वचेसाठी आणि केसांसाठी कोरफड हा एक रामबाण उपाय मानला जातो. अशात कांद्याचा रसात कोरफडीचा गर मिक्स करून केसांवर लावल्यास केसगळती आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. सोबतच केस चमकदार आणि मुलायमही होतील.

मध आणि कांद्याचा रस

हिवाळ्यात केस फार रफ होतात. अशात अनेकजण केस मुलायम, सिल्की करण्यासाठी वेगवेगळ्या जेलचा आणि केमिकल्सचा वापर करतात. या कारणाने केस डॅमेज होतात. अशात कांद्याच्या रसासोबत मध मिक्स करून लावणं फायदेशीर ठरतं. मधामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. ज्यामुळे केसगळतीही कमी होते.

खोबऱ्याचं तेल आणि कांद्याचा रस

अनेकदा शाम्पू करण्याआधी खोबऱ्याच्या तेलाने डोक्याची मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. आणखी जास्त फायद्यासाठी यात कांद्याचा रसही मिक्स करू शकता. या मिश्रणाने केस मजबूत होतील आणि केसगळतीची समस्या दूर होते.

Web Title: Hair Fall : Use onion juice this way to reduce hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.