Lokmat Sakhi >Beauty > रोज किती केस गळणं-तुटणं असतं नॉर्मल? पाहा कधी चिंतेची बाब वाढते, काय कराल उपाय

रोज किती केस गळणं-तुटणं असतं नॉर्मल? पाहा कधी चिंतेची बाब वाढते, काय कराल उपाय

Hair Fall Tips : केसगळती किती प्रमाणात झाल्यावर चिंतेचं कारण नसतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:29 IST2025-09-06T14:27:35+5:302025-09-06T14:29:00+5:30

Hair Fall Tips : केसगळती किती प्रमाणात झाल्यावर चिंतेचं कारण नसतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

Hair Fall Tips : How much hair fall daily is considered normal | रोज किती केस गळणं-तुटणं असतं नॉर्मल? पाहा कधी चिंतेची बाब वाढते, काय कराल उपाय

रोज किती केस गळणं-तुटणं असतं नॉर्मल? पाहा कधी चिंतेची बाब वाढते, काय कराल उपाय

Hair Fall Tips : केस पांढरे होणं किंवा केसगळती या समस्या तर आजकाल जवळपास सगळ्यांना हैराण करत आहेत. ज्यामुळे कमी वयातच अनेकांचे केस विरळ होतात किंवा पुरूषांचं टक्कल पडतं. पण हेही सत्य आहे की, केस गळणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे प्रत्येकवेळी केसगळतीची समस्या चिंतेची बाब नसते. जर रोज कंगव्याने केस करताना किंवा केस धुताना गळतात. पण जेव्हा केस एकाच भागातून जास्त गळत असतील किंवा टक्कल पडल्यासारखं दिसत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. पण मग केसगळती किती प्रमाणात झाल्यावर चिंतेचं कारण नसतं? हेच आज आपण पाहणार आहोत.

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, एका व्यक्तीचे दररोज जवळपास ५० ते १०० केस गळणं सामान्य बाब आहे. केसांचे फॉलिकल्स एका प्रोसेसमधून जात असतात. यात पहिली स्टेज एनाजेन असते, ज्यात केसांचा विकास होतो आणि त्यानंतर टेलोजेन स्टेज येते ज्याला रेस्ट स्टेजही म्हटली जाते. यात केसगळती सुरू होते. केसांची उगवण्याचं आणि गळण्याचं हे चक्र तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत रोम कूप सक्रिय राहतात आणि नवीन केस येत राहतात. सामान्यपणे निरोगी लोकांच्या डोक्यावर ८० हजार ते १२०,००० केस असतात. ज्या  लोकांचे केस छोटे असतात त्यांना केसगळतीची समस्या कमी होते. लांब केस असलेल्या लोकांना ही समस्या अधिक असते. 

जास्त केसगळतीची कारणं

जर तुमचे एका दिवसात १०० पेक्षा जास्त केस गळत असतील तर याचा अर्थ तुमचे केस सामान्यापेक्षा जास्त गळत आहेत. जसजसे केस पातळ होत जातात, ते कमी होत जातात. सामान्यपणे गळणारे केस प्रक्रियेदरम्यान परत येतात. 

केसगळतीची वेगवेगळी कारणं असतात. हार्मोन्समध्ये बदल, बाळाला जन्म देणे, गर्भनिरोधक गोळ्या बदलणे किंवा बंद करणे, वजन जास्त कमी करणे, ताप किंवा आजार, ऑपरेशननंतर आणि फार जास्त तणाव असला तर केसांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. 

जर केस फार जास्त तुटत असतील तर हेल्दी डाएट घ्या. प्रोटीन असलेले पदार्थ खा. आहारात काही बियांचा आणि ड्राय फ्रूट्सचा समावेश करा. असं केल्यास केस नॅचरली तुटणंकमी होईल.

Web Title: Hair Fall Tips : How much hair fall daily is considered normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.