केस गळणे, तुटणे आणि कमकुवत होणे या समस्या सामान्य वाटत असल्या तरी याचा संपूर्ण परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर होतो.(Hair care tips) आपलेही केस सुंदर, लांबसडक आणि दाट असावे असं प्रत्येक महिलेला वाटतं. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात.(hair care tips for women) अनेकदा केस तुटून पातळ होतात. केसांना पोषणाची कमतरता भासल्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही.(prevent hair fall naturally)
केसांसाठी आपण अनेक महागडे उत्पादने, शाम्पू आणि तेलाचा वापर करतो.(how to stop hair breakage naturally) परंतु केसांना फक्त बाहेरुनच नाही तर आतून देखील पोषण मिळणे महत्त्वाचे आहे.(ayurvedic hair growth tips) केस मुलायम, लांब आणि दाट हवे असतील तर आहारात काही बदल करायला हवा.(natural way to thicken hair) बाहेरचे जंक फूड खाण्याऐवजी आपण घरी बनवलेले पौष्टिक अन्नपदार्थ खायला हवे. ज्यामुळे शरीरासोबत केसांना देखील त्याचा खूप फायदा होईल.
पावसाळ्यात डोक्याला खाज सुटते, उवा-लिखा झाल्या? ५ सोपे उपाय - केसांच्या समस्या होतील दूर
तज्ज्ञ म्हणतात केसांची मुळे अधिक मजबूत असली की केसगळती होत नाही. त्यासाठी त्यांनी आरोग्यदायी आणि चविष्ट अशा पेयाबद्दल सांगितले आहे. जे प्यायाल्याने केसांची वाढ पुन्हा होण्यास मदत होते. हे पेय बनवण्यासाठी आपल्याला आवळा, बीट आणि काळी मिरी आणि आल्याचा रस लागेल. आवळा आणि बीट मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस करा. त्यात आल्याचा रस आणि चिमूटभर काळी मिरी घाला. हा रस रोज प्यायाल्याने आपले केस अधिक मजबूत होऊ शकतात.
आवळा हा औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असल्याने केसांसाठी फायदेशीर आहेत. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यांना मजबूत करण्यास आणि चमकवतात.
केसगळती कमी करण्यासाठी, केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने करण्यासाठी आणि केसांना चमकदार करण्यासाठी बीट फायदेशीर ठरते. बीटामध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक आहेत जे केसांना मुळांपासून मजबूत करण्यास आणि केसांच्या इतर समस्या कमी करण्यास मदत करतात.