Join us

केस खूपच तुटतात-टक्कल पडतंय? मोहरीच्या तेलासोबत हे पदार्थ स्काल्पला लावा; दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:46 IST

Hair Fall Control Tips Mustard Oil For Hair Growth : काही खास पदार्थांचा केसांवर वापर केल्यास केसांची वाढ दुप्पटीनं होऊ शकते.

केस गळण्याची समस्या (Hair Fall Solution) आजकाल अनेकांना उद्भवते. वेगवेगळी महागडी उत्पादनं वापरूनही केसांवर काहीही परीणाम होत नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही हेअरफॉल कंट्रोल करू शकता. स्काल्प हेल्दी ठेवून केसांची वाढ व्यवस्थित करण्यासााठी तुम्हाला मोहरीचं तेल उपयोगी पडेल. मोहरीचं तेल अनेक वर्षांपासून केसांसाठी फायदेशीर मानलं गेलं आहे. काही खास पदार्थांचा केसांवर वापर केल्यास केसांची वाढ दुप्पटीनं होऊ शकते. (Hair Fall Control Tips Mustard Oil For Hair Growth)

मोहरीचे तेल खास का आहे? (Why Mustard Oil Beneficial For Hair Growth)

मोहरीच्या तेलात व्हिटामीन ई, ओमेगा ३ फॅटी एसिड्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि केसांची मुळं मजबूत होतात. याचा नैसर्गिक हिटींग इफेक्ट स्काल्पला उष्णता देतो ज्यामुळे हेड हेअर फॉलिकल्स एक्टिव्ह होतात.

मोहरीच्या तेलात हे पदार्थ मिसळून केसांना लावा

मोहरीच्या तेलात मेथी मिसळून लावा. मेथीत प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड मोठ्या प्रमाणात असते. रात्रभर भिजवलेल्या मेथीची पेस्ट तयर करून तेल हलकं कोमट करून यासोबत लावा. ज्यामुळे केस लांबसडक होतील.

कढीपत्त्यासोबतही तुम्ही हे तेल लावू शकता. कढीपत्त्यात व्हिटामीन बी, आयर्न मोठ्या प्रमाणात असते. तेल उकळल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्या नंतर स्काल्पला लावा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल.

आवळ्यात व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केसांना मजबूती आणि चमक मिळते किंवा आवळा पावडरही तुम्ही तेलासोबत लावू शकता.

कांद्याच्या रसात सल्फर असते ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो. मोहोरीच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्यास केसांना शाईन मिळते.

आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

एलोवेरा स्काल्पला गारवा देतो आणि फोड्यांपासूनही आराम मिळतो. या तेलानं नियमित मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होते.

दातांना खालून खड्डे पडलेत-किड लागली? डॉक्टर सांगतात १ खास उपाय, अलगद किड निघेल बाहेर

तेल कोमट गरम करून घ्या. हाताच्या बोटांनी स्काल्पवर १० ते १५ मिनिटं मसाज करा. कमीत कमी १ तास किंवा रात्रभर तसंच सोडा. नंतर सौम्य शॅम्पून केस धुवा. आठवड्यातून २ वेळा ही प्रोसेस करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी