Join us

हेल्मेट किंवा टोपी घातल्याने केस गळतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:47 IST

Helmet and Cap Effect on Hair : मुळात सत्य जरा वेगळंच आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत. जेणेकरून केसगळतीची समस्या दूर करण्यास आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. 

Hair fall reason: केसगळती ही एक गंभीर समस्या असून याची कारणंही वेगवेगळी असतात. अनेकदा आपणही ऐकलं असेल की, सतत टोपी घातल्यानं किंवा हेल्मेट वापरल्यानंही सुद्धा केस गळतात. टक्कल पडतं. अशात अनेकांना असा प्रश्न पडतो की, खरंच असं होतं का? पण मुळात सत्य जरा वेगळंच आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत. जेणेकरून केसगळतीची समस्या दूर करण्यास आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. 

केसगळतीची मुख्य कारणं

वेगवेगळे एक्सपर्ट नेहमीच हे सांगतात की, हेल्मेट किंवा टोपी केसगळतीचं मुख्य कारण नाही. केसगळतीचं मुख्य कारणं जेनेटिक्स, हार्मोनल बदल, केसांची योग्य काळजी न घेणं, केमिकल्सचा वापर ही असतात. सततचा स्ट्रेस, कमी झोप घेणे, जंक फूड, फास्ट फूड हेही केसगळतीची कारणं असतात.

टोपी किंवा हेल्मेटचं काय? (Helmet and Cap Effect on Hair)

सतत टोपी घातल्यानं किंवा हेल्मेट वापरल्यानं थेटपणे केसगळतीची समस्या होत नाही. जास्तवेळ डोकं झाकूण ठेवल्यानं घाम येतो आणि त्यामुळे केसांमध्ये धूळ-माती किंवा कोंडा जमा होता. याच कारणाने डोक्याच्या त्वचेमध्ये इन्फेक्शन होतं. जर हेल्मेट फार टाइट असेल तर केसांवर अधिक घर्षण होतं. अशात केस तुटतात किंवा गळतात. याचाच अर्थ असा की, टोपी किंवा हेल्मेट केसगळतीचं मुख्य कारण नाहीत. केसांची किंवा डोक्याची स्वच्छता महत्वाची आहे. 

केसांचं नुकसान कसं टाळाल?

केसांचं नुकसान टाळायचं असेल तर नेहमी स्वच्छ आणि योग्य साइजचं हेल्मेट वापरा. हेल्मेटच्या आत कॉटन लायनर किंवा मुलायम कापड लावा. जेणेकरून घाम पुसला जाईल. केस नेहमी माइल्ड शाम्पूने धुवावे. आठवड्यातून दोनदा खोबऱ्याचं तेल किंवा बदामाच्या तेलानं मसाज करा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स