Join us

केस धुतले की जास्त गळतात? जावेद हबीब सांगतात केस धुण्याची खास ट्रिक; केस गळणंच थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:47 IST

Jawed Habib Shares Right Way To Wash hairs : सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुण्याची योग्य पद्धत  कोणती ते सांगितले आहे.

केसांची योग्य पद्धतीनं काळजी घेतल्यास केस हेल्दी दिसून येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही केस कसे धुता (Hair Wash) हे फार महत्वाचे असते. केस व्यवस्थित धुत नसाल किंवा वेळेत धूत नसाल तर तुम्हाला केसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Hair Wash techniques By Jawed Habib) जसं की केस गळणं, केस कोरडे पडणं, केस पांढरे होणं... या कॉमन समस्या आहेत. सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुण्याची योग्य पद्धत  कोणती ते सांगितले आहे. जावेद हबीब सांगतात की या पद्धतीनं केस धुतल्यास केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतात. केस कसे धुवायचे ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. (Hair Expert Jawed Habib Shares a Right Way To Wash hairs)

केस कसे धुवावेत? (How To Wash Hairs)

जावेद हबीब सांगतात की केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केस स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.यासाठी केस नियमित स्वच्छ धुवायला हवेत. केस धुण्याआधी प्री कंडिशनिंग करा. यासाठी केस आधी ओले करा. त्यानंतर केसांना तेल लावा (Ref). तेल लावून ५ मिनिटं केसांवर हलक्या हातानं मसाज करा. जावेद सांगतात की तुमचे केस मोठे असतील तर लगेच विंचरू नका. ५ मिनिटं तेल लावून तसंच ठेवा त्यानंतर केस धुवा.

डोकं स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. तुम्ही साबणानेसुद्धा केस धुवू शकता. शिकेकाई, आवळा, रिठा यांसारखे हर्ब्स केस धुण्यासाठी उत्तम आहेत. नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्यास तुमचे केस ना कधी तुटणार ना केसांमध्ये कोंडा होणार. तसंच केसांच्या इतर समस्यांवरही आराम मिळेल.

या गोष्टींची काळजी घ्या (Hair Care Tips)

केस धुताना गरजेपेक्षा जास्त घासू नका. जर तुम्ही जास्त केस घासले तर त्यामुळे हेअर्स डॅमेज होऊ शकतात. केस धुण्यासाठी जेंटल शॅम्पूचा वापर करा. केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरू नका. केसांवर खूप जास्त शॅम्पू लावू नका. तुमच्या केसांचे वॉल्यूम किती आहे ते पाहून शॅम्पू किती वापरायचा ते ठरवा. केस धुतल्यानंतर केसांना खूप रफ हातांनी स्पर्श करू नका. हेअर वॉशनंतर केस सॉफ्ट होतात त्यामुळे ते सहज तुटतात म्हणून सॉफ्ट टॉवेलनंच केस पुसा. केस पुसण्यासाठी खूप रफ टॉवेलची निवड करू नका. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी