Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस पिकलेत? जावेद हबीब सांगतात मेहेंदीत 'हा' पदार्थ कालवून लावा, काळे-शायनी होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:00 IST

Apply Mustard Oil In Mehendi To Get Black Hairs : जर तुमचे केस अतिशय कोरडे असतील तर तुम्ही तेलाचे प्रमाण थोडे वाढवू शकता.

थंडीच्या दिवसांत केसांना मेहेंदी लावणं कठीण जातं. कारण मेहेंदी थंड असल्यामुळे सर्दी होणं, डोकेदुखीचा त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात. प्रसिद्ध हेअर एक्सपोर्ट जावेद हबीब यांनी या समस्येवर एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे.

मेहेंदीच्या मिश्रणात १ चमचा मोहोरीचं तेल घालायला हवं.  मोहोरीच्या तेलाचा स्वभाव उष्ण असतो. हिवाळ्यात जेव्हा आपण मेहेंदी डोक्याला लावतो तेव्हा मोहोरीचे तेल त्यातील थंडावा संतुलित करते. यामुळे स्काल्पला जास्त थंडी वाजत नाही आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते.

मोहोरीच्या तेलात विशिष्ट नैसर्गिक गुणधर्म असतात जे मेहेंदीचा रंग अधिक गडद आणि पक्का करण्यास मदत करतात. जर तुम्हाला केसांवर लालसर छटा हवी असेल तर तेलाचा वापर नक्कीच फायदेशीर ठरतो. (Hair Expert Jawed Habib Says Apply Mustard Oil In Mehendi To Get Black Hairs)

 केसांचा कोरडेपणा दूर होतो

मेहेंदी लावल्यानंतर अनेकदा केस कोरडे होतात. मोहोरीच्या तेलात ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणइ व्हिटामीन ई मुबलक प्रमाणात असते. हे तेल केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करते. ज्यामुळे मेहेंदी धुवून टाकल्यानंतरही केस मऊ आणि चमकदार राहतात.

 केसांच्या वाढीसाठी फायदेशीर 

 मोहोरीच्या तेलामुळे टाळूचा रक्तप्रवाह सुधारतो. हिवाळ्यात टाळूची त्वचा कोरडी पडून कोंडा होतो. मोहोरीच्या तेलातील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म कोंडा कमी करतात आणि केसांना मजबूती देण्यास मदत करतात.

केसांसाठी मेहेंदीचा वापर कसा करावा मेहेंदी भिजवताना  नेहमीप्रमाणे लोखंडी कढईचा वापर करा. मेहेंदी लावण्यापूर्वी त्यात १ मोठा चमचा मोहोरीचे तेल नीट मिसळून घ्या. हिवाळ्यात मेहेंदी तासनतास लावून ठेवण्याऐवजी दीड ते २ तासांत धुवून टाका. मोहोरीचं तेल नैसर्गिक क्लिंजर म्हणूनही काम करते.

घरच्या इडल्या कडक होतात? ८ ट्रिक्स, मऊसूत-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या-पीठ दुप्पट फुलेल

जावेद हबीब यांच्यामते मोहोरीच्या तेलामुळे केसांतील नैसर्गिक प्रथिनं टिकून राहतात. अनेकदा मेहेंदी लावल्यावर केस निर्जीव दिसू लागतात. पण तेलाचा अंश असल्यामुळे केसांना एक प्रकारची नैसर्गिक चमक मिळते आणि ते अधिक दाट दिसतात.

भाकरी चिरते-थापायला जमत नाही? ५ टिप्स, मऊसूत-वरून फुगलेली होईल बाजरीची भाकरी

जर तुमचे केस अतिशय कोरडे असतील तर तुम्ही तेलाचे प्रमाण थोडे वाढवू शकता. मेहेंदी धुतल्यानंतर केस लगेच शॅम्पूनं धुण्याऐवजी साध्या पाण्यानं धुवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूनं पुन्हा केस धुवा. जेणेकरून तेलाचा आणि मेहेंदीचा परिणाम टिकून राहील. मोहोरीच्या तेलाचा उग्र वास घालवण्यासाठी तुम्ही यात काही  थेंब लिंबाचेही घालू शकता.  यामुळे हेअर केअर प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Jawed Habib's tip: Mustard oil for darker, softer hair with henna.

Web Summary : Jawed Habib suggests adding mustard oil to henna for winter hair care. It balances coolness, darkens color, reduces dryness, and promotes hair growth by improving scalp circulation. Use it correctly for shiny, strong hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी