Join us

केसांत खूपच कोंडा- केस कोरडे होतात? दाट-सुंदर केसांसाठी जावेद हबीब सांगतात २ खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 22:47 IST

Hair Expert Jawed Habib 4 Home Remedies : त्वचेवर पांढऱ्या पापडीसारखे फोड येतात. ज्यामुळे खाजही येते. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

हिवाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी घेणं एखाद्या टास्कप्रमाणे असते. या वातावरणात केसांच्या बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागोत. केसांमध्ये कोंडा होणं ही सगळ्यात कॉमन जाणवणारी समस्या असते. थंड हवेमुळे स्काल्प डिहायड्रेट होतो ज्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढतो (Hair Care Tips).

त्वचेवर पांढऱ्या पापडीसारखे फोड येतात. ज्यामुळे खाजही येते. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे फक्त १ दिवसांत कोंडा कमी होईल. कोंडा केसांतून मुळापासून काढून टाकण्यासाठी काय करायचं ते समजून घेऊ. (Hair Expert Jawed Habib 4 Home Remedies To Get Rif Of Dandraff)

सॅव्हलॉन आणि पाण्याचं मिश्रण

जर केसांमध्ये जास्त कोंडा असेल तर काही उपाय करायला हवेत. यासाठी एका भांड्यात १ चमचा सॅव्हलॉन आणि ५ चमचे पाणी घेऊन एक द्रावण तयार करा. कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं हे द्रावण स्काल्पला लावा आणि १५ मिनिटं असचं सोडून द्या. नंतर शॅम्पूनं केस धुवून घ्या. हा उपाय केल्यास आठवडयाभरातच केसांचा कोंडा कमी होईल.

एलोवेरा जेल

हा उपाय खूपच सोपा आणि परिणामकारक आहे. जावेद हबीब सांगतात की फ्रेश एलोवेरा जेल यासाठी तुम्हाला लागेल. हे जेल केसांना लावून व्यवस्थित चोळून घ्या. नंतर हे जेल १० मिनिटं लावून तसंच सोडा. नंतर नॉर्मल शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल. हा उपाय करण्यासाठी साध्या शॅम्पूमध्ये लिंबाचा रस आणि एप्पल सायडर व्हिनेगर मिसळून एक मिश्रण तयार करा. नंतर हे सोल्यूशन आठवड्यातून एकदा आपल्या केसांना लावून केस धुवा. ज्यामुळे केसांचा कोंडा नष्ट होईल.

कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता जसं की पाणी न वापरता कांदा वाटून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. ३० मिनिटांनी शॅम्पूनं केस धुवा. हा उपाय नियमित केल्यानं कोंडा नैसर्गिकरित्या कमी होईल. हिवाळ्यातही केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. केस धुण्यासाठी रूम टेंम्परेचरवरचं पाणी वापरू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jawed Habib's tips for dandruff-free, healthy hair in winter.

Web Summary : Winter dandruff woes? Javed Habib suggests Savlon/water mix or aloe vera. Apply, rinse. Onion paste also helps. Avoid hot water for washing hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी