ज्याप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या भागांची काळजी करणं गरजेचं असतं (Hair Care Tips) त्याचप्रमाणे केसांची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही केसांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर केस कमकुवत होऊ लागतात आणि केसांमध्ये कोरडेपणा येतो. खासकरून प्रवास करताना केस लवकर खराब होतात. कारण केसांवर धूळ-माती खूपच पडते. केसांना मजबूत आणि काळे बनवण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता. हा मास्क जास्वंदाची फुलं आणि दह्यापासून तयार झालेला असतो. (Hair Care Yogurt And Hibiscus Mask For Thick Hairs)
केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हा मास्क बनवण्याची योग्य पद्धत समजून घ्यायला हवी. हा एक परिणामकारक उपाय आहे. यासाठी सगळ्यात आधी जास्वंदाची फुलं घ्या. त्यात मध आणि तुमच्या आवडीचे इसेंशियल ऑईल घाला हे तिन्ही पदार्थ केसांसाठी आवश्यक असतात.
अडजस्टेबल पैंजणांचा खास ट्रेंड; १० नाजूक सुंदर डिजाईन्स, सुंदर-उठून दिसतील पाय
हे बनवण्यासाठी जास्वंदाची पानं धुवून वेगळी करा. नंतर यात दही आणि इसेंशियल ऑईल मिसळा मग एक छान पेस्ट तयार होईल. थोडं मध मिसळून पेस्ट घट्ट होईल. ही पेस्ट तुम्ही केसांना लावू शकता ही एक चांगली ट्रिटमेंट आहे.
केसांना हेअर मास्क कसा लावावा? (How T0 Apply Hair Mask On Hairs)
हा हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत आहे. ही पेस्ट स्काल्पासून केसांच्या अंतिम टोकापर्यंत लावा. या गोष्टींची काळजी घ्या की केसांच्या मुळांना तुम्ही व्यवस्थित हेअर मास्क लावू शकता. केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस हेल्दी राहतील. केसांना आतून बाहेरून सर्व बाजूंनी पोषण मिळेल.
हा मास्क केसांना किती वेळ लावून ठेवावा
हा मास्क लावून लवकर काढू नका. जवळपास १ तास लावून ठेवा जेणेकरून केसांना पोषण मिळेल. त्यानंतर शॅम्पूच्या साहाय्यानं केस स्वच्छ धुवून घ्या. केस ड्रायरने न सुकवता नैसर्गिक पद्धतीनं सुकवा. केस नैसर्गिक पद्धतीने सुकू द्या. टॉवेलनं केस पुसून घ्या. हलक्या हातानं रगडण्याचा प्रयत्न करा.
तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....
केसांचे टेक्स्चर कसे बदलेल?
हा हेअर मास्क केसांसाठी बराच फायदेशीर ठरतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा मास्क लावाल तेव्हा त्यात फरक दिसून येईल. केसांना हा हेअर मास्क लावल्यानं चांगली चमक येईल याशिवाय केस मऊ-मुलायम होतील. आठवड्यातून २ वेळा हा मास्क केसांना लावा, बराच परिणामकारक ठरेल. या पद्धतीचा हेअर मास्क लावून तुम्ही केसांना हेल्दी बनवू शकता. याची खासियत अशी की कोणत्याही प्रकारचे केमिकल्स लावावे लागणार नाहीत आणि केस खराबही होणार नाहीत.
केसांना तुम्ही जितक्या नॅच्युरल वस्तू लावाल तितकंच केस चांगले दिसतील. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या मऊ राहतात. केसांना कंडिशनिंग होते. कंडिशनर लावण्याची गरजच नाही. जसजसं तुम्ही याचा वापर करता तसं परिणाम दिसायला सुरूवात होते. प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावला तर केसांवर वेगळीच चमक येईल. केस मऊ-मुलायम होतील.