सध्याच्या धावपळीच्या जगात प्रदूषण, धूळ आणि केमिकल्स उत्पादनांमुळे केसांचे आरोग्य बिघडणे सामान्य झालं आहे. केस निर्जीव, कोरडे आणि निस्तेज दिसू लागले की आपण महागडे ट्रिटमेंट्स करतो.(Hair care Tips) हेअर स्पाच्या नावाखाली हजारो रुपये खर्च केले जातात. पण हेअर स्पामध्ये वापरले जाणारे केमिकल्स हे केसांचं अधिक नुकसान करतात.(salon hair spa at home) इतकेच नाही तर प्रत्येक वेळी १५०० ते २००० रुपये खर्च करणं सर्वांनाच शक्य नसतं. अशा वेळी घरच्या घरीच, अगदी कमी खर्चात पार्लरसारखा हेअर स्पा करता येईल. काही घरगुती उपाय करुन आपण केसांचे आरोग्य सुधारु शकतो.(natural hair treatment at home) ज्यामुळे केस मऊ सुळसुळीत आणि चमकदार होतील.
ॲपल बॉडी शेप असेल तर कधीच घालू नका 'या' ५ ट्राऊझर्स, पॅण्टची स्टाइल ठरवते तुमचा स्मार्ट लूक
हेअर स्पा करण्यासाठी आपल्याला नारळाचे तेल, केळी, गुलाब पाणी, कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूलची गरज लागेल. आयुर्वेदिक डॉक्टर शोभना म्हणतात हेअर स्पा घरच्या घरी करणं खूप सोप आहे. यासाठी आपल्याला दोन केळी घेऊन त्यात दोन चमचे गुलाब जल घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करा. यामध्ये १ चमचा कोरफड जेल, दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला आणि नीट मिसळा, हेअर मास्क तयार होईल.
हेअर स्पा करण्यासाठी आपल्याला केसांना नारळाच्या तेलाने चांगले मसाज करावं लागेल. तासाभरानंतर कोरडेपणा आणि कुरळेपणा कमी करण्यासाठी केसांना वाफ द्या. नंतर तयार केलेला हेअर मास्क केसांना लावा. ४० मिनिटानंतर केस धुवा. हा नैसर्गिक हेअर स्पा आपल्या केसांना मॉइश्चयराझर करण्यास मदत करतो. तसेच केसांचा कोरडेपणा देखील कमी करतो.
इतकंच नाही तर आपण केसांना दही, कोरफडीचा गर आणि खोबऱ्याचे तेल एकत्र करुन केसांना लावू शकतो. हा मास्क केसांवर खोलवर मॉइश्चर करते. ज्यामुळे कोरडे आणि रफ केस मऊ-सुळसुळीत करतो. २०–३० मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. आपण नियमितपणे हे ५ घरगुती उपाय केल्यास महागड्या पार्लर स्पाची गरज भासणार नाही. कमी खर्चात, कोणतेही साइड इफेक्ट्स न होता केस मऊ, सुळसुळीत आणि नैसर्गिकरीत्या चमकदार होतात.
