Lokmat Sakhi >Beauty > पावसात भिजून - प्रवासात केस राठ कोरडे झाले? ३ उपाय - केस चटकन होतील मऊ मुलायम

पावसात भिजून - प्रवासात केस राठ कोरडे झाले? ३ उपाय - केस चटकन होतील मऊ मुलायम

Hair care tips, Hair has become sticky due to rain? follow 3 steps hair will get soft : विविध कारणांमुळे खराब झालेले केस होतील मस्त स्वच्छ. घरीच करा या काही सोप्या स्टेप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 13:31 IST2025-08-15T13:28:01+5:302025-08-15T13:31:24+5:30

Hair care tips, Hair has become sticky due to rain? follow 3 steps hair will get soft : विविध कारणांमुळे खराब झालेले केस होतील मस्त स्वच्छ. घरीच करा या काही सोप्या स्टेप्स.

Hair care tips, Hair has become sticky due to rain? follow 3 steps hair will get soft. | पावसात भिजून - प्रवासात केस राठ कोरडे झाले? ३ उपाय - केस चटकन होतील मऊ मुलायम

पावसात भिजून - प्रवासात केस राठ कोरडे झाले? ३ उपाय - केस चटकन होतील मऊ मुलायम

उत्सव म्हणजे जेवढी मज्जा तेवढीच त्वचा आणि केसांची काळजी घ्यावी लागते. गोकुळाष्टमी सारखे सण असले की केसांवर विविध पदार्थांचा मारा होतो. लोणी, दही केसांना चिकटून राहते. जाता जात नाही. (Hair care tips, Hair has become sticky due to rain? follow 3 steps hair will get soft.)त्यामुळे केसांची गुणवत्ता कमी होते. म्हणून मग सण साजरे करण्याचे काही जण टाळतात. मात्र तसे न करता काही उपाय करुन केसांची काळजी घेतली की उत्सव बिनधास्त साजरे करता येतात.  खालील कृती फॉलो करुन पाहा. नक्की फारक जाणवेल. 

१. काही नैसर्गिक उपाय आहेत जे  नक्की करुन पाहा केस अगदी छान राहतात. केसात रंग, दही, फुले अडकली असतील तर सगळ्यात आधी केसांवरुन साधे पाणी ओता. हात फिरवत पाणी केसांवरुन खाली काढा. नंतर केस हलके कोरडे करायचे. जरा कोरडे झाले की बोटांनी किंवा मोठ्या दातांच्या कंगव्याने गुंता कमी करायचा. बोटांचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरते. 

२. नंतर एका लहान भांड्यात दोन ते तीन लिंबांचा रस काढून त्यात थोडे कोमट पाणी मिसळा मिश्रण नीट ढवळून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत हळूवारपणे लावून ५ मिनिटे तसेच ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने धुवायचे. लिंबातील नैसर्गिक आम्ल लोणी किंवा दह्यातील घटक सौम्य करते आणि केसांतून ते घटक काढून टाकते.

२. यानंतर शिकेकाईचा वापर करणे फायद्याचे ठरते. दोन चमचे शिकेकाई पावडर रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण हलकेच ढवळून केसांवर लावा. शिकेकाई हा नैसर्गिक क्लेंझर असून केसांतील तेलकटपणा, चिकटपणा सहज काढतो आणि केस मऊ ठेवतो.

३. रिठा देखील फार उपयुक्त  ठरतात. रिठा पाण्यात उकळून फेसाळ द्रव तयार करा आणि गार झाल्यावर तो केसांवर लावा. रिठा लोणी किंवा दही काढण्यात तर मदत करतोच, शिवाय केसांना नैसर्गिक चमक देतो. 

शिकेकाईचे पाणी केसांना पोषण देते. त्यामुळे ते नेहमी वापरणेही फायद्याचे ठरते. हे सारे उपाय केल्यावर तुम्ही जो शाम्पू नेहमी वापरता त्याने अलगद केस धुवा. जास्त शाम्पू न वापरता धुवा. म्हणजे केसांना वासही छान येईल.  
 

Web Title: Hair care tips, Hair has become sticky due to rain? follow 3 steps hair will get soft.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.