पावसाळ्याची मजा काही वेगळीच असते ही अगदी खरं आहे. पण रोजच पाऊस पडत असेल तर त्यामुळे होणारे त्रासही खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात.. जसं की कपडे वाळत नाहीत, कपड्यांमधून आंबूस वास येतो. घरात खूप दमट, कोंदट वाटतं. घरात आणि घराबाहेरही डासांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं. भिंतींना ओल येते, फर्निचरमधूनही कुबट वास येतो.. त्यामुळे घरातच एक प्रकारचा ओलसर वास सतत जाणवतो. या झाल्या घरातल्या गोष्टी.. अशाच काही तक्रारी आपल्या केसांच्या आणि त्वचेच्याही असतात. केसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या दिवसात केस खूप ऑईली होतात. अगदी आज धुतले तरी उद्या लगेचच चिपचिपित, तेलकट, चिकट होऊन जातात. वातावरण थंड असल्याने वारंवार केस धुणंही नको वाटतं (hair care tips for monsoon). अशावेळी केसांचा सिल्कीपणा टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल ते पाहूया..(how to make your oily, freezy hair silky and smooth without washing?)
चिकट केस न धुताही सिल्की कसे करायचे?
१. टाल्कम पावडर
टाल्कम पावडरचा वापर करून चिकट, चिपचिपित झालेले केस अगदी एका मिनिटांत पुन्हा एकदा छान सिल्की आणि सुगंधी करता येतात. हा उपाय करण्यासाठी जरा मोठ्या दातांचा कंगवा वापरा.
Guru Purnima 2025 Prasad: प्रसादाचा शिरा करताना ५ पदार्थ आठवणीने घाला! शिरा होईल एकदम परफेक्ट
त्या कंगव्यावर तुमच्या घरातली कोणतीही टाल्कम पावडर टाका आणि मग केस विंचरा. पावडरमुळे चिटकून बसलेले केस मोकळे होतील आणि त्यांच्यातून छान सुगंधही येईल.
२. ड्राय शाम्पू
चिपचिपित, चिकट केसांना अवघ्या काही मिनिटांतच पुन्हा एकदा सिल्की आणि मुलायम करण्यासाठी हा उपायही चांगला आहे. हा उपाय करण्यासाठीही तुम्हाला केस धुण्याची गरज नाही.
डेलीसोप क्वीन तुलसी विरानी पुन्हा येणार, एकेकाळी प्रेमात असलेले आता परत स्वीकारतील का तिला?
बाजारात अनेक प्रकारचे ड्राय शाम्पू मिळतात. ते शाम्पू तुमच्या केसांच्या मुळाशी स्प्रे करा आणि त्यानंतर काही मिनिटांनी केस विंचरा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल. हे शाम्पू तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही खरेदी करू शकता.