हल्ली केसगळती किंवा केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका हवी असल्यास आपण अनेक केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो.(Hair care tips for dry and frizzy hair) केसगळती रोखण्यासाठी अनेक शाम्पू किंवा तेल केसांना लावतो. विविध प्रकारचे हेअर मास्कचा वापर करतो.(Curd and fenugreek hair mask) परंतु, कितीही काही केले तरी केसगळती काही थांबत नाही. (Natural remedy for hair fall control)
पुरेशा आहारासोबतच केसांकडे वेळोवेळी लक्षण देणे देखील तितकेच गरजेचे आहे.(How to stop hair loss naturally) केसांची वाढ करण्यासाठी आणि केसातील कोंडाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर घरीच तयार केलेल्या हेअर मास्कचा वापर करा.(home remedies for hair fall) मेथीच्या दाण्यापासून आपण घरीच हेअर मास्क तयार करु शकतो.
मेथीच्या दाण्यामध्ये प्रथिने, लोह आणि निकोटिनिक ॲसिडसारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. मेथीचे दाणे केवळ केसांच्या वाढीला चालना देत नाहीत तर कोंडा आणि खाज सुटणे यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. तर दही केसांना ओलावा आणि पोषण देते. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
हेअर मास्क कसा बनवाल?
एका भांड्यात २ चमचे दही आणि १ चमचा कुटलेले मेथीचे दाणे घाला. याचे चांगले मिश्रण तयार करुन जाडसर पेस्ट करा. ही पेस्ट केसांच्या टाळूपासून मुळांपर्यंत लावा. ३० ते ४० मिनिटे ठेवा. केस कोमट पाण्याने धुवा. केमिकल फ्री शाम्पूचा वापर करा.
मेथीचे दाणे केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे त्यांची वाढ होते. दही आणि मेथीचे मिश्रण केसांना कोंड्यापासून मुक्त होण्यास आणि केस स्वच्छ ठेवण्यास मदत करते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करायला हवा. केस धुतल्यानंतर केसांना अतिरिक्त पोषण मिळावे यांसाठी तेलाने हलका मसाज करा.