lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कियारा अडवाणीसारखे सुंदर केस हवेत, वापरा हे 4  हेअरपॅक! काळ्याभोर केसांची घरगुती देखभाल

कियारा अडवाणीसारखे सुंदर केस हवेत, वापरा हे 4  हेअरपॅक! काळ्याभोर केसांची घरगुती देखभाल

हिवाळ्यात केस मऊ मुलायम ठेवण्यासाठी बाजारात भरपूर हेअर प्रोडक्ट असतात. मात्र त्यांच्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे केसांवर वाईट परिणाम होण्याचा धोकाच जास्त असतो. अभिनेत्री कियारा अडवाणीही हिवाळ्यात आपलं केसांचं सौंदर्य महागड्या हेअर प्रोडक्टसने नाही तर स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या गोष्टींचा वापर करुन जपते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:03 PM2021-11-26T17:03:19+5:302021-11-26T17:14:05+5:30

हिवाळ्यात केस मऊ मुलायम ठेवण्यासाठी बाजारात भरपूर हेअर प्रोडक्ट असतात. मात्र त्यांच्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे केसांवर वाईट परिणाम होण्याचा धोकाच जास्त असतो. अभिनेत्री कियारा अडवाणीही हिवाळ्यात आपलं केसांचं सौंदर्य महागड्या हेअर प्रोडक्टसने नाही तर स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या गोष्टींचा वापर करुन जपते.

Hair Care Tips: For Beautiful hair like Kiara Advani use these 4 hairpacks! | कियारा अडवाणीसारखे सुंदर केस हवेत, वापरा हे 4  हेअरपॅक! काळ्याभोर केसांची घरगुती देखभाल

कियारा अडवाणीसारखे सुंदर केस हवेत, वापरा हे 4  हेअरपॅक! काळ्याभोर केसांची घरगुती देखभाल

Highlightsदही केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावी उपाय आहे.दह्यामुळे केसांच्या मुळाशी संसर्ग होत नाही.दह्याचा वापर करुन तयार केलेल्या हेअर पॅकमुळे केस वाढतात आणि मुलायम होतात.

हिवाळ्यात त्वचेप्रमाणे केसांचीही काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यातल्या कोरड्या हवेचा परिणाम केसांवरही होतो त्यामुळे केस रुक्ष होतात. केसांमधे कोरडेपणा आल्यानं केसांची चमक तर हरवतेच पण केस गळायलाही लागतात. केसांच्या मुळाशी कोरडेपणा निर्माण झाल्यानं खाज येणं, कोंडा होणं या समस्याही निर्माण होतात. यामुळेच हिवाळ्यात केसांची काळजी घेणं आवश्यक आहे. आता केसांची काळजी घ्यायची म्हणजे कोणतं प्रोडक्ट विकत आणायचं? असा प्रश्न पडतो. केस मऊ मुलायम ठेवण्यासाठी बाजारात भरपूर हेअर प्रोडक्ट असतात. मात्र त्यांच्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे केसांवर वाईट परिणाम होण्याचा धोकाच जास्त असतो. केस जपण्यासाठी, हिवाळ्यातही ते सुंदर दिसण्यासाठी त्याला घरगुती उपायांचीच गरज आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीही हिवाळ्यात आपलं केसांचं सौंदर्य महागड्या हेअर प्रोडक्टसने नाही तर स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या गोष्टींचा वापर करुन वाढवते.

Image: Google

केसांची काळजी घेण्यासाठी स्वयंपाकघरात बरेच घटक असतात. पण एक घटक असा आहे जो केसांसाठी , केसांच्या समस्यांसाठी रामबाण उपाय समजला जातो तो म्हणजे दही. या दह्यासोबत वेगवेगळ्या घरगुती गोष्टींचा वापर करुन हेअर पॅक करता येतात. कियारा अडवाणीही आपल्या केसांसाठी पामुख्याने दह्याचा उपयोग करते. केसांसाठी दह्याचा पॅक तयार करताना ती अंड्याचा उपयोग करते. कियारा अडवाणीसारखे दाट आणि काळेभोर केस हवे असतील तर या दह्याचा लेप वापरुन पाहायलाच हवा. दही आणि अंड्यातील गुणधर्मांचा मिलाफ होऊन केस सुंदर होण्यास मदत होते. दह्यात प्रामुख्याने मॉश्चरायझर असतं. त्यामुळे केसांना दही लावल्यानं केस मऊ होतात. तसेच अंड्यामुळे केसांना चमक येते. दही आणि अंडं एकत्र करुन लावल्यानं थंडीत केस कोरडे आणि रुक्ष होण्याची समस्या सुटते. दह्याच्या या हेयर पॅकसोबतच कियारा केसांना तेल लावण्यावरही भर देते. केसांची काळजी घेताना आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी केसांना तेल लावायला हवं.

Image: Google

दह्याच्या लेपानं काय होतं.

दह्यामुळे केसांना नक्की काय फायदा होतो हे समजलं तर या लेपाची केसांच्या सौंदर्यासाठी काय गरज आहे हे समजेल.

* दह्यात अँण्टिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे गुणधर्म केसांच्या मुळांशी कुठलाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेतात.
* दह्यामुळे कोंडा असल्यास तो निघून जातो. डोक्यातली खाज थांबते.
* दह्यामुळे केसांचं कंडीशनिंग तर होतंच सोबतच केसांच्या मुळांशी आद्र्रता टिकवून ठेवण्याचं कामही दह्यातील गुणधर्म करतात.
* दह्यात ब-5 आणि ड जीवनसत्त्व असतं. यामुळे केसांचे बीजकोष मजबूत होतात.
* दह्याच्या लेपाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यात अंडं घातलं तर केसांच्या मुळांना ताकद मिळून ती घट्ट होतात. केस गळणं कमी होतं.
* या लेपामुळे केस पटकन लांब होतात आणि चमकतात देखील.
* या लेपामुळे खराब झालेले केस रिपेअर होतात.
* केसांना उंदरी लागणे, केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे यासारख्या समस्यांवर दह्याचा लेप उपयोगी ठरतो.

 

कसा करावा लेप?

हा लेप तयार करण्यासाठी एक अंड आणि दोन चमचे दही घ्यावं. एका भांड्यात अंडं फोडून फेटून घ्यावं. नंतर त्यात दही घालावं. हा हेअर मास्क केसांच्या मुळांशी लावावा. साधारणत: अर्ध्या तासानं सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा हेयर मास्क केसांना लावावा.
दह्याच्या लेपाचे आणखीही प्रकार आहेत. ज्यात दही आणि अंडं यासोबत लिंबू, केळ आणि खोबर्‍याचं तेल वापरलं जातं.

दही आणि लिंबू

यासाठी 2 चमचे लिंबाचा रस, एक वाटी दही आणि एक अंडं घ्यावं. एका भांड्यात दही, लिंबाचा रस आणि अंडं हे एकत्र करुन चांगणं फेटून घ्यावं. हा हेअर मास्क केसांना लावावा आणि 20 मिनिटांनी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. हा हेयर मास्क आठवड्यातून एकदा लावावा.
या लेपातील लिंबाचे गुणधर्म केस गळणं, कोंडा होणं, डोक्यात बारीक फोड येणं यावर गुणकारी ठरतात.

दही आणि केळ

हा हेयर मास्क तयार करण्यासाठी अर्धं केळ, एक अंडं आणि 2 चमचे दही घ्यावं. एका बाऊलमधे केळ आधी कुस्करुन घ्यावं. केळाची पेस्ट एकदम मऊ व्हायला हवी. नंतर त्यात दही आणि अंडं घालावं. हे सर्व नीट फेटून घ्यावं. हा हेयर मास्क केसांना लावावा. वीस मिनिटांनी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावावा.
या लेपातील केळामुळे केस मजबूत होतात. केळात नैसर्गिक तेल, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे केस मुलायम होतात. त्याचप्रमाणे केसातील कोंडा घालवण्यासाठी केसांची वाढ होण्यासाठी हा दही आणि केळाचा लेप उपयोगी ठरतो.

दही आणि खोबर्‍याचं तेल

4 चमचे दही, 1 चमचा खोबर्‍याचं तेल आणि 1 अंडं घ्यावं. एका वाटीमधे दही आणि अंडं फेटून मिश्रण तयार करावं. त्यात खोबर्‍याचं तेल घालावं. हा हेअर मास्क संपूर्ण केसांना व्यवस्थित लावावा. तो 15 मिनिटं राहू द्याव. नंतर सौम्य शाम्पू लावून केस थंडं पाण्यानं धुवावेत. आठवड्यातून एक वेळा हा हेअर मास्क लावावा.
या लेपातील खोबर्‍याच्या तेलामुळे केसांना आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात. हिवाळ्यात रुक्ष झालेल्या केसांना चमक येण्यासाठी हा मास्क उपयोगी ठरतो. हा मास्क म्हणजे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे. तसेच खराब केस रिपेअर करण्याला या लेपाची मदत होते. खोबर्‍याच्या तेलातून केसांना आवश्यक प्रथिनं मिळतात.

Web Title: Hair Care Tips: For Beautiful hair like Kiara Advani use these 4 hairpacks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.