Foods Which Cause Hair Fall : आहारातील पोषणाची कमतरता, काळजी घेण्यात आळस, प्रदूषण, धूळ-माती, काही केमिकल्समुळे हल्ली बऱ्याच लोकांचे केस वेगाने आणि आधीपेक्षा जास्त गळतात. चांगले, सुंदर केस आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. त्यामुळे त्यांसाठी महागडे शाम्पू, तेल आणि हेअर ट्रिटमेंट केल्या जातात. पण केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहाराकडे लक्ष देणं लोक विसरतात. हीच त्यांची मोठी चूक ठरते आणि मग केसांच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं.
मुळात अनेकांना हे माहीत नसतं की, केसगळतीचं मुख्य कारण आपल्या आहारातून दडलेलं असतं. आपण जे काही खातो त्याचा थेट प्रभाव आपल्या केसांवर पडत असतो. त्यामुळे आपणही केसगळतीने हैराण असाल तर डाएटमधून काही पदार्थ लगेच बाहेर केले पाहिजे. कारण हेच ते पदार्थ आहेत, जे केसगळतीला अधिक जबाबदार असतात.
साखर आपण ऐकलं असेलच की, साखरेने लठ्ठपणा वाढतो. पण आपल्याला कल्पना नसेल की, साखरेमुळे केस सुद्धा गळतात. जेव्हा आपण खूप जास्त गोड पदार्थ खातो, तेव्हा शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. वाढलेल्या इन्सुलिनमुळे पुरूष आणि महिला दोन्हींमध्ये 'एंड्रोजन' हार्मोनना अॅक्टिव करतं. या हार्मोनमुळे केसांच्या फॉलिकल्सचं नुकसान होतं. ज्यामुळे केस पातळ होऊन गळतात. त्याशिवाय साखरेमुळे डोक्याच्या त्वचेमध्ये सूज निर्माण होते, ज्यामुळे केसांचे मूळ कमजोर होतात.
मैद्याचे पदार्थ
मैद्याचे पदार्थ जसे की, पिझ्झा, पास्ता, पांढरे ब्रेड आणि रिफाइंड कार्ब्स शरीरात शुगरची लेव्हल वेगाने वाढवात. या पदार्थांमुळे शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडंत. जे लोक आपल्या आहारात रिफाइंड कार्बोहायड्रेट जास्त घेतात, त्यांच्यात वेळेआधीच केस गळणे आणि टक्कल पडणे अशा समस्या अधिक होतात.
डाएट सोडा आणि आर्टिफिशिअल स्वीटनर
बरेच लोक वजन कमी करण्याच्या नादात सामान्य साखरेऐवजी डाएट सोडा किंवा शुगर फ्री पर्याय निवडतात. त्यांमध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर असतं, जे केसांच्या फॉलिकल्सचं नुकसान करू शकतं. डोक्याच्या त्वचेचंही सुद्धा याने नुकसान होतं. जर आपण सोडा किंवा कोल्ड ड्रिंक पित असाल, तर आपल्या केसांची चमक निघून जाते आणि ते मुळापासून कमजोर होतात.
अल्कोहोल आणि कॅफीन
अल्कोहोलमुळे शरीर डिहायड्रेट होतं. शरीरात जर पाण्याची कमतरता झाली तर केस कोरडे आणि निर्जीव होऊन तुटतात. त्याशिवाय अल्कोहोल शरीरात झिंकचं प्रमाण कमी होतं. झिंक हे केसांच्या वाढीसाठी एक आवश्यक मिनरल्स आहे. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणंही शरीरात पोषक तत्वांचं अॅब्जॉर्प्शनमध्ये अडथळा निर्माण करतं.
काय खावं?
केसांच्या समस्या दूर करायच्या असतील तर केवळ काही गोष्टी सोडून चालत नाही. काही गोष्टींचा आहारात समावेश सुद्धा करणं गरजेचं असतं. केसगळती रोखण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळी, पनीर, पालक, मेथी आणि डाळिंबाचा समावेश करा. अक्रोड खा आणि अळशीच्या बियाही वापरा.
