Hair care In Monsoon : पावसाळ्यात पावसात भिजल्यावर सर्दी-पडसा तर होतोच, सोबतच साजलेल्या पाण्यात चालल्यानं किंवा पावसात भिजल्यानं त्वचा आणि केसांसंबंधी समस्य देखील होतात. तुम्हीही अनुभवलं असेल की, पावसाळ्यात ढगाळ वातावरण जास्त राहतं, ज्यामुळे सूर्यप्रकाश कमी राहतो. अशात भिजलेले केस लवकर कोरडेही होत नाहीत. केस जर वाळले नाही तर केसांची दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये डोकं आणि केसांची देखील विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टिप्स आम्ही देत आहोत.
काय करावे उपाय?
१) आंघोळ करताना डोक्याची त्वचा पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्यासोबत योग्य अॅंन्टी-बॅक्टेरियल किंवा अॅंन्टीफंगल शाम्पूचा वापर करावा. याने इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते. केसांमध्ये मॉईश्चर वाढवणारा शाम्पू वापरणे टाळा.
२) केसांची काळजी घेण्यासोबतच आहारातही काही बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. महत्त्वाची बाब म्हणजे केस जास्त वेळ भिजलेले राहू देऊ नका.
३) कॅफिनयुक्त पेय टाळा. यात कॉफीचाही समावेश आहे. यामुळे शरीराचं तापमान वाढतं. तसेच डोक्याच्या त्वचेमध्ये तेलकटपणा वाढतो. त्यामुळे खाज येण्याचं प्रमाणही वाढतं.
४) कामाशिवाय पावसात बाहेर पडणे टाळा. पावसात भिजल्यानंतर केस माईल्ड क्लिंजरने स्वच्छ धुवावेत. तसेच त्यांना कंडिशनर लावावे.
५) ताण तणाव कमी करा. खूप ताणामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी टाळूवर खाज येण्याची समस्यादेखील वाढते.
६) humidity-protective जेलचा वापर करूनदेखील केसातील अतिरिक्त मॉईश्चर कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होईल.