Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातील २ गोष्टी केसांना लावा, खराट्यासारखे कोरडे केस होतील बोटॉक्स केल्यासारखे सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 17:00 IST

Best natural hair spa at home for beginners: Chemical-free hair smoothening at home: घरच्या घरी महागडा हेअर बोटॉक्स कसा करायचा पाहूया.

आपले केस सुंदर, लांब आणि चमकदार असावे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण सध्याचे प्रदूषण, धावपळीची जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि अगदी खराट्यासारखे ताठ दिसू लागतात. या समस्येवर उपाय म्हणून अनेकजण पार्लरमध्ये जाऊन हेअर बोटॉर्स किंवा केराटिन सारख्या महागड्या ट्रीटमेंट घेतात. या ट्रिटमेंटमुळे केस तात्पुरते चांगले दिसतात खरे, पण त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात आणि त्यातील रसायनांमुळे भविष्यात केसांचे नुकसान होण्याचीही भीतीही असते. आपणही पार्लरसारखाच रेशमी आणि चमकदार लूक घरच्या घरी तेही स्वयंपाकघरातील फक्त दोन साध्या गोष्टी वापरुन मिळवू शकतो. घरगुती हेअर बोटॉक्स हा नैसर्गिक उपाय आहे, जो केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांचा कोरडेपणा मुळापासून नष्ट करतो. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामामुळे आणि उष्णतेमुळे केस जास्त गुंतायला लागतात, तेव्हा ही सोपी ट्रिक केसांसाठी वरदान ठरू शकते. घरच्या घरी महागडा हेअर बोटॉक्स कसा करायचा पाहूया. 

टोमॅटोच्या स्क्रबने पेडीक्युअर! महागड्या उपायांपेक्षा असरदार उपाय-घरच्याघरी पाय होतील स्वच्छ मऊ

पार्लरसारखे मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी आहे. यासाठी आपल्याला १ ते २ चमचे शुद्ध मोहरीचे तेल आणि अर्धी वाटी कोमट पाणी लागेल. 

एका बाऊलमध्ये अर्धी वाटी कोमट पाणी घ्या. त्यामध्ये १ ते २ चमचे मोहरीचे तेल घाला. हे मिश्रण चमच्याने किंवा हँड ब्लेंडरने जोरात फेटून घ्या. जोपर्यंत मिश्रणाचा रंग दुधाळ होत नाही किंवा त्यावर फेस येत नाही, तोपर्यंत ते मिक्स करत राहा. जेव्हा या मिश्रणाला क्रीमी टेक्सचर येईल तेव्हा हेअर बोटॉक्स रेडी होईल. 

हे तयार झालेले मिश्रण हातावर घेऊन हळूहळू केसांच्या मुळांना आणि केसांच्या पूर्ण लांबीवर लावा. ५ ते १० मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हे मिश्रण केसांच्या आतपर्यंत शोषले जाते. केसांवर हे मिश्रण ३० ते ४० मिनिटे राहू द्या. ज्यामुळे केसांना पोषण मिळेल. नंतर शाम्पूने केस धुवा आणि कंडिशनर लावा. 

मोहरीच्या तेलात ओमेगा- ३ फॅटी अॅसिड्स असतात जे केसांना नैसर्गिक चमक देतात. कोमट पाणी तेलाचे हे मिश्रण केसांच्या क्यूटिकल्समध्ये जाऊन ओलावा टिकवून ठेवते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Transform dry hair with two kitchen ingredients: Botox-like results.

Web Summary : Achieve silky, shiny hair at home using mustard oil and warm water. This natural hair Botox nourishes the scalp, eliminates dryness, and provides a cost-effective alternative to salon treatments. Regular use can combat summer-related hair issues.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी