Lokmat Sakhi >Beauty > केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत

केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत

frizzy hair solution at home: natural botox treatment for hair: silky smooth hair tips: स्वयंपाकघरातील १ सोपा उपाय केल्यास फ्रिझी केस, कोंडा आणि फाटे फुटण्याची समस्या कमी होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2025 15:36 IST2025-07-27T15:36:19+5:302025-07-27T15:36:52+5:30

frizzy hair solution at home: natural botox treatment for hair: silky smooth hair tips: स्वयंपाकघरातील १ सोपा उपाय केल्यास फ्रिझी केस, कोंडा आणि फाटे फुटण्याची समस्या कमी होईल.

hair botox at Home home remedy for split ends dry hair treatment naturally silky smooth hair tips | केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत

केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत

ऋतू बदलला की, आपल्या आरोग्यासह त्वचा आणि केस यांच्यावर परिणाम होतो.(Hair care Tips)  या काळात आपल्याला त्वचेची जशी काळजी घ्यावी लागते, तशीच काळजी केसांचीही घ्यावी लागते. (natural botox treatment for hair) कारण अनेकदा पावसात भिजल्यामुळे केस ओले राहतात. ज्यामुळे कोंडा होतो. इतकेच नाही तर बाहेरचे प्रदूषण, हवामान यामुळे केस कोरडे पडतात त्यांना फाटे फुटतात.(silky smooth hair tips) केसात कोंडा वाढला की, त्यांच आपोआप गळणं सुरु होतं.(how to repair damaged hair) अशावेळी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन केस ट्रिम करतो, बोटॉक्स करतो. केमिकल्स उत्पादनाचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिक वाढतात. पण स्वयंपाकघरातील १ सोपा उपाय केल्यास फ्रिझी केस, कोंडा आणि फाटे फुटण्याची समस्या कमी होईल. (easy hair care routine)

त्वचेवर येईल तेज! स्वयंपाकघरातील ३ पदार्थांनी करा चेहरा स्वच्छ, पिंपल्स- सुरकुत्यांचा त्रास होईल कमी

केसांना बोटॉक्स करण्यासाठी टिप्स  

केसांना बोटॉक्स करण्यासाठी आपण घरगुती जेलचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला २ कप पाण्यात २ चमचे अळशीच्या बिया घालून ते उकळवायला हवे. त्यानंतर हे जेल गाळून घ्या. हे चाळणीतून गाळून घ्या किंवा कापडात बांधून गाळा. तुमच्या केसांसाठी जेल तयार होईल. यात आपण रोझमेरी इसेन्शियल ऑइलचे काही थेंब मिसळू शकता. 


हे हेअर स्मूथनिंग जेल केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा. हे जेल डोक्यावर एक ते दीड तास ठेवल्यानंतर धुवा. कोरडे केस मऊ होण्यास मदत होईल. हे जेल आपण आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना लावू शकतो. यामुळे केसांची वाढ चांगली होईल, केस चमकण्यास मदत होते. 

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते. ओमेगा - ३ टाळूवरील जळजळ कमी करते आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ होते. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे केसांना ताकद आणि चमक देते. यात असणारे लिग्रान्स आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे केसांचे नुकसान कमी होते. केसांची वाढ अधिक करण्यासाठी आपण अळशी आणि तांदळाचे पाणी तयार करुन केसांना लावू शकतो. 
 

Web Title: hair botox at Home home remedy for split ends dry hair treatment naturally silky smooth hair tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.