Join us

केस सारखे चिपचिपीत होतात? मग हा 'असा' स्प्रे घरी तयार करा वापरायला सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 12:16 IST

Hair becomes sticky? Then make this spray at home, easy to use : केस तेलकट होतात आणि चिकट दिसतात. अशावेळी केसांना लावण्यासाठी तयार करा हा स्प्रे. वापरायला अगदीच सोपा. केस होतील मस्त मऊ.

केसांसंबंधी कोणत्या ना कोणत्या तरी समस्या प्रत्येकाला सहन कराव्या लागत असतात. मग काहींचे केस प्रचंड गळतात तर काहींचे विरळ होतात. (Hair becomes sticky? Then make thi spray at home, easy to use)काही जणांचे केस वयाआधीच पांढरे होतात. बऱ्याच जणांना टक्कल पडायला लागते. काहींच्या केसात भरपूर कोंडा झालेला असतो. हे असे त्रास लोकांना होत असतात. ज्यांना केसांचे काही त्रास नाही असे फार कमी लोक असतात. केस गळत कमी असले तरी काही जणांचे केस फार तेलकट दिसतात. त्यामुळे केस कायम घामटलेले वाटतात. अनेकांना घाम खुप येतो. जर केसात घाम येत असेल तर त्यामुळे केस फार चिकट होतात. हातालाही तसेच जाणवतात आणि चिकट तेलकट झाल्यामुळे खाज सुटते. तुम्हालाही असा त्रास होतो का? तर मग हा एक स्प्रे खास वापरायलाच हवा. 

हा स्प्रे ऑफीसमध्ये वापरु शकता. प्रवासातही वापरु शकता. घरी तर नक्कीच वापरा. झोपताना वापरा किंवा सकाळी उठल्यावर वापरा. केस चिपचिपीत होत नाहीत. लगेच वाळूनही जातात. केस छान मऊ होतात. हाताच्या बोटांच्या टोकांनी जरा प्रेमाने स्प्रे मारल्यावर मसाज करायचा. थोडा वेळ केस मोकळे ठेवायचे म्हणजे ओले राहत नाहीत.     

स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला जास्वंदीची ताजी पाने आणि एक फुल लागेल. तसेच लिंबाचा रस वापरायचा. रोजमेरी घ्यायची आणि गवती चहाची पात घ्या आणि पाणी घ्यायचे. कृती अगदीच सोपी आहे. फार काही करावे लागत नाही. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. थोडावेळ उकळायचे मग त्यात जास्वंदीचे फुल घालायचे आणि काही पानेही घालायची. छान उकळायची. त्यात रोजमेरी घालायची पाण्याचा रंग बदलत जाईल. रोजमेरीही उकळायची. त्यात एक गवती चहाची पात घाला. जास्त पाती पण घेऊ शकता. सगळे पदार्थ एकत्र छान उकळायचे. पाणी आटून अर्धे होईल. मग गॅस बंद करायचा आणि त्यात थोडा लिंबाचा रस पिळायचा. 

पाणी गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर सगळे पदार्थ हाताने चिरडायचे. त्याचा चोथा काढून टाकायचा. एकदा पाणी गाळून घ्यायचे. पातळ कापडाने गाळले तर जास्त चांगले गाळले जाते. गाळलेले पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवायचे. दहा ते पंधरा दिवस पाणी चांगले राहते. घरी असताना बाटली फ्रिजमध्ये ठेवा.     

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीहेल्थ टिप्स