आपण दिवसभरात जे काही खातो-पितो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीरासह त्वचेवर आणि केसांवर देखील होत असतो.(Ayurvedic drink for hair and skin) आपण आहारात पुरेसे पोषक तत्व असणारे पदार्थ खाल्ले आणि हायड्रेशनची काळजी घेतली तर चेहरा आणि केसांच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल. (Morning drink for glowing skin)आहारतज्ज्ञ म्हणतात रोज सकाळी आपण मॉर्निंग ड्रिक प्यायला हवे.(Natural remedy for frizzy hair) ज्यामुळे केसांचा पोत तर सुधारेल पण चेहऱ्याच्या अनेक समस्या कमी होतील. जाणून घेऊया कोणते ड्रिंक फायदेशीर आहे. (Ayurvedic solution for dry skin)
अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..
मॉर्निंग ड्रिंक बनवण्यासाठी पाण्यात चमचाभर चिया सीड्स घालून ते मिसळा. हे पाणी नियमितपणे प्या. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने, जस्त आणि तांबे सारखे विविध पोषक तत्व असतात. ज्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चिया सीड्समध्ये प्रथिने आणि आवश्यक अमीनो आम्ल जास्त असते जे केसांची ताकद आणि वाढ होण्यास मदत करेल. यात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या कूपांना नुकसान होण्यापासून वाचवते, ज्यामुळे केस पातळ होणे कमी करतात. तसेच चिया सीड्समध्ये झिंक आणि तांब असल्यामुळे केस गळती थांबण्यास आणि टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
चिया सिड्स हे पाणी शोषून घेतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून त्वचेचे रक्षण करतात. यामुळे अकाली येणारे वृद्धत्व, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असल्यामुळे त्वचेची चमक वाढते.
मॉर्निंग ड्रिंकला आणखी हेल्दी करण्यासाठी आपण कोमट पाण्यात चिमूटभर हळद घालून प्यायला हवे. यामुळे त्वचेसह केसांना देखील फायदा होतो. हळदीमध्ये करक्यूमिन असते, जे त्याच्या दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सि़डंट गुणधर्मासाठी ओळखले जाते. नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिबंध करणारा गुणधर्म हळदीत असतो ज्यामुळे केसातील कोंडा बरा होतो. तसेच टाळूचे आरोग्य राखण्यास मदत होते. हळदीचे पाणी प्यायल्याने मुरुमे आणि डाग कमी होतात. तसेच त्वचेचा रंग सुधारतो. चेहऱ्यावर आलेला ताण कमी करुन अकाली येणारे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.