Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस गळणं थांबवतात पेरुची पानं, 'या' पद्धतीनं लावा-दाट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:47 IST

Guava Leaves For Hair Growth And Thick Hairs (How To Grow Hairs Naturally) : थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला सुरूवात होते पण पेरू खाल्ल्यानं शरीराला जितके फायदे होतात तितकेच पेरूच्या पानांमुळेही होतात

केस गळणं, कमी वयात केस पिकणं या समस्या सध्या खूपच कॉमन झाल्या आहेत. या समस्या टाळण्यासाठी केसांवर महागडी उत्पादनं वापरली जातात. पण निसर्गत: जे पदार्थ उपलब्ध असतात त्यांचा वापर करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता (Hair Fall Natural  Solution). थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला सुरूवात होते पण पेरू खाल्ल्यानं शरीराला जितके फायदे होतात तितकेच पेरूच्या पानांमुळेही होतात (Home Remedies For Hair Fall). पेरूची पानं केसांसाठी वरदान ठरतात.  कारण पेरूच्या पानांमध्ये बरीच पोषक तत्व असतात. (Guava Leaves For Hair Growth And Thick Hairs)

गुणकारी तत्वांचा खजिना आहेत पेरूची पानं

 पेरूच्या पानांमध्ये व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, एंटी ऑक्सिडेंट्स, रायबोफ्लेविन आणि नियासिन, एंटीऑक्सिंट्स असतात तसंच यात एंटी इंफ्लेमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात. ही तत्व केसांच्या फॉलिक्लना पोषण देतात. ज्यामुळे केस दाट आणि लांबसडक होतात. (Use Guava Leaves Water To Get Thick Hairs)

पेरूच्या पानांमध्ये व्हिटामीन सी कोलेजनचं प्रमाण जास्त असते. ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात तसंच केस गळणंही कमी होतं. यातील व्हिटामीन बी कॉम्पलेक्स केसांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे स्काल्पमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि नवीन केस उगवण्यास मदत होते

पेरूच्या पानांमध्ये अनेक एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे संक्रमण दूर राहते. ज्यामुळे कोंड्याची समस्या मुळापासून कमी होण्यास मदत होते तसंच खाजेवरही आराम मिळतो. एंटी ऑक्सिडेंट्स फ्री रेडिक्लसशी लढतात. ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते आणि केस चमकदार होतात. पेरूच्या पानांच्या नियमित वापरानं केसांमध्ये प्राकृतिक मेलेनिन तयार होण्यास मदत होते. 

पेरूच्या पानांचा केसांवर वापर कसा कराल?

मुठभर पेरूची पानं १ लिटर पाण्यात २० मिनिटं उकळवून घ्या. जेव्हा पाण्याचा रंग गडद होईल तेव्हा गाळून घ्या आणि पाणी थंड करा. शॅम्पूनं केस धुतल्यानंतर हे पाणी केसांवर घालून स्काल्पची मालिश करायला करा.  हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही साईट इफेक्ट्स उद्भवत नाही. याशिवाय खर्चाचीही बचत होते.  पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून ही पेस्टसुद्धा तुम्ही हेअरपॅकच्या स्वरूपात केसांना लावू शकता ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Guava leaves stop hair fall: simple remedy for thick hair.

Web Summary : Guava leaves, rich in nutrients like Vitamin C and antioxidants, strengthen hair follicles, reduce hair fall, and promote growth. Regular use improves scalp health, reduces dandruff, and adds shine.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स