आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उद्भवते. एकदा केस पांढरे झाले की कितीही प्रयत्न केला तरी आधीसारखे काळेभोर होत नाहीत. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसाचं अजूनच नुकसान होत जातं. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (How To Get Rid Of White Hairs Naturally) केसांवर अनावश्यक हिटिंग टुल्सचा वापर केल्यामुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. तसंच केमिकल्सयुक्त शॅम्पू, हेअर स्प्रे वारंवार वापरल्यानंही केसाचं नुकसान होतं.
आवळा आणि नारळाचं तेल
आवळा पावडर आणि नारळाचं तेल योग्य प्रमाणात घेऊन मध्यम आचेवर गरम करा. हे मिश्रण गरम करून मग कोमट झाल्यावर स्काल्पला लावून मालिश करा. आठवड्याभरातून एकदा हे तेल केसांना लावून हलक्या हातानं मालिश करा. नियमित हा उपाय केल्यानं केस सुंदर, दाट होण्यास मदत होईल. नारळाचे तेल केसांना आतून पोषण देते. याशिवाय केस गळतीही थांबवते. म्हणून नारळाचं तेल केसांवर वापरणं उत्तम ठरतं
मेहेंदी आणि कॉफी पावडर
पाण्यात कॉफी पावडर घालून व्यवस्थित उकळवून घ्या. यात मेहेंदी पावडर घालून व्यवस्थित मिसळा. हा हेअर पॅक आपल्या डोक्याला आणि केसांना लावा. नियमित याचा वापर केल्यानं केस मुळापासून काळे आणि दाट होतील.
कांद्याचा रस आणि मध
एक चमचा मधात कांद्याचा रस मिसळा. नंतर आपल्या डोक्याच्या त्वचेवर लावून ३० मिनिटांसाठी तसंच सोडा. यामुळे मेलेनिनचं उत्पादन वाढेल आणि केस पांढरे होण्याची समस्या उद्भवणार नाही.
कढीपत्ता आणि दह्याचा हेअर पॅक
कढीपत्ता दह्यात मिसळून याची पेस्ट तयार करून लावल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळते तसंच केस पांढरे होत नाहीत. याशिवाय केस मऊ, शायनी होतात.
मेथीचा हेअर पॅक
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे दाणे वाटून त्याची पेस्ट तयार करा. आठवड्यातून एकदा आपल्या डोक्याला लावा. यामुळे केस मजबूत होतात. मेलेनिनचं उत्पादनं कंट्रोल होतं.
