पांढऱ्या केसांच्या (Grey Hairs) समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात. अधिकाधिक लोक या समस्येचा सामना करत आहेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हेअर डाय, हेअर कलरचा वापर करायला हवा. काही घरगुती उपाय करून तुम्ही केस पुन्हा काळेभोर करू शकता. प्रसिद्ध डॉक्टर सलिम जैदी यांनी अलिकडेच युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयुर्वेदीक तेलाबाबत सांगितले आहे. ७ दिवसांत पांढरे केस काळे करणं एकदम सोपं आहे. यासाठी तेल घरच्याघरी बनवायला हवं. (Doctor Saleem Zaidi Ayurvedic Oil Which Make White Hairs Black From Roots)
जर वयाच्या पंचविशीत किंवा पस्तीशीत केस पांढरे होत असतील तर याला प्रिमॅच्योर ग्रेईंग असं म्हणतात. केस पांढरे होण्याची अनेक कारणं असतात. सगळ्यात कॉमन जेनेटिक रिजन आहे. कुटूंबातील बऱ्याच जणांचे केस पांढरे असतील तर तुम्हालाही केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ताण-तणाव, स्ट्रेस, पोषक तत्वांची कमतरता, थायरॉईड, बाजारातील इतर उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस पांढरे होतात.
पांढरे केस काळे कसे करावेत?
डॉक्टर सलीम सांगतात की केस पांढरे करण्यासाठी आयुर्वेदीक तेलाचा वापर करण्याबरोबरच लाईफस्टाईल चांगली ठेवणंही महत्वाचं आहे. म्हणून तेल कसं बनवायचं ते जाणून घ्यायला हवं.
आयुर्वेदीक तेल कसं तयार करायचं?
हे तेल तयार करण्यासाठी एका भांड्यात १ कप नारळाचं तेल, २ चमचे सुके आवळ्याचे तुकडे, १ मूठभर ताजी कढीपत्त्याची पानं, २ चमचे भृंगराज पावडर. हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. कढीपत्ता आणि आवळ्याचे तुकडे काळे होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर तसंच सोडून द्या. नंतर कंटेनरमध्ये गाळून ठेवा.
हे आयुर्वेदीक तेल तुम्ही आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा लावा. रात्री झोपण्याआधी केसांना तसंच लावून ठेवा नंतर सकाळी शॅम्पूनं केस धुवून घ्या. चांगल्या परीणामांसाठी सतत ३ महिने लावा. डॉक्टर सलिम सांगतात की केसांना काळे करण्यासाठी आहारात बदल करायला हवा. सकाळी सकाळी २ चमचे काळे तीळ ताज्या आवळ्यासोबत मिसळून खा. यासोबत खजूर, बदाम, पालक या पदार्थांचा आहारात समावेश करा.
Web Summary : Struggling with grey hair? An Ayurvedic oil, as shared by Dr. Salim Zaidi, can naturally blacken hair in just 7 days. Prepare it at home with coconut oil, dried amla, curry leaves, and bhringraj powder. Apply regularly and adjust your diet for best results.
Web Summary : सफेद बालों से परेशान हैं? डॉ. सलीम जैदी द्वारा साझा किया गया एक आयुर्वेदिक तेल केवल 7 दिनों में बालों को प्राकृतिक रूप से काला कर सकता है। इसे नारियल तेल, सूखे आंवला, करी पत्ते और भृंगराज पाउडर से घर पर तैयार करें। नियमित रूप से लगाएं और सर्वोत्तम परिणामों के लिए अपने आहार को समायोजित करें।