Lokmat Sakhi >Beauty > ग्रीन टी प्यायल्यानेच नाही चेहऱ्याला लावल्यानेही दिसाल सुंदर! ‘हा’ उपाय-ओपन पोर्सच्या समस्येचा इलाज...

ग्रीन टी प्यायल्यानेच नाही चेहऱ्याला लावल्यानेही दिसाल सुंदर! ‘हा’ उपाय-ओपन पोर्सच्या समस्येचा इलाज...

green tea for open pores : how to use green tea for skin pores : home remedies for open pores : natural toner for open pores : ओपन पोर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते, तर कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स होण्याची भीती नसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 14:04 IST2025-08-05T13:49:51+5:302025-08-05T14:04:05+5:30

green tea for open pores : how to use green tea for skin pores : home remedies for open pores : natural toner for open pores : ओपन पोर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते, तर कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स होण्याची भीती नसते.

green tea for open pores how to use green tea for skin pores home remedies for open pores natural toner for open pores | ग्रीन टी प्यायल्यानेच नाही चेहऱ्याला लावल्यानेही दिसाल सुंदर! ‘हा’ उपाय-ओपन पोर्सच्या समस्येचा इलाज...

ग्रीन टी प्यायल्यानेच नाही चेहऱ्याला लावल्यानेही दिसाल सुंदर! ‘हा’ उपाय-ओपन पोर्सच्या समस्येचा इलाज...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना कायम कोणती ना कोणती त्वचेची समस्या सतावते. प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार समस्या देखील तितक्याच वेगळ्या असतात. त्वचेच्या (green tea for open pores) अनेक समस्यांपैकी ओपन पोर्स किंवा त्वचेवरील छिद्र उघडून ती मोठी होण्याची समस्या बऱ्याचजणींना असते. त्वचेवर असणाऱ्या (how to use green tea for skin pores) ओपन पोर्समुळे त्यात धूळ, माती, धूलिकण जाऊन अडकतात. ज्यामुळे (home remedies for open pores) हे ओपन पोर्स पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. यामुळे आपली त्वचा अधिकच खराब आणि खडबडीत दिसू लागते. इतकंच नाही, तर या छिद्रांच्या मार्फत आपली त्वचा श्वास घेत असते आणि जर ही छिद्रच बंद झाली तर त्वचा नीट श्वास घेऊ शकत नाही, परिणामी अनेक स्किन प्रॉब्लेम्स सतावतात(natural toner for open pores).

ओपन पोर्सची समस्या कमी करण्यासाठी आपण अनेक महागड्या ट्रिटमेंट्स व ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो परंतु यांचा परिणाम झटपट होणारा असाल तरी तात्पुरता होतो. याउलट, काही नैसर्गिक घरगुती उपाय केले तर त्याचा परिणाम हा हळूहळू पण कायमचा टिकणारा असतो. यासाठीच, आपण ओपन पोर्सची समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये चक्क ग्रीन टी चा वापर करु शकतो.  ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेवर खोलवर परिणाम करून ओपन पोर्स कमी करून त्वचा टाईट करण्यास मदत करतात. त्वचेवरील ओपन पोर्सची समस्या कमी करण्यासाठी ग्रीन टीसारखा नैसर्गिक घटक उपयोगी ठरतो, तर कोणत्याही प्रकारचे  साइड इफेक्ट्स होण्याची भीती नसते. त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी चे टोनर कसे तयार करायचे ते पाहूयात. 

ओपन पोर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी... 

ग्रीन टी जशी वजन कमी करण्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी किंवा संपूर्ण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, तशीच ती त्वचेसाठीसुद्धा उपयोगी ठरते. ग्रीन टीपासून तयार केलेल टोनर चेहऱ्यावरील मोठे खड्डे आणि ओपन पोर्स कमी करण्यास मदत करते. यासोबतच, पावसाळ्यातील उष्ण आणि दमट हवामानात त्वचेवर सतत येणारा घाम आणि चिकटपणा दूर करण्याचे काम ग्रीन टी टोनर करते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, टाईट आणि तजेलदार दिसते.

कडुलिंबाची पाने ५ प्रकारे वापरा,  डास-माशा पळतील दूर, घरात वाटेल प्रसन्न रोज...

ओपन पोर्ससाठी ग्रीन टी टोनर कसं तयार करायचं ? 

ओपन पोर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी टोनर खूपच उपयुक्त ठरते. हे नैसर्गिक टोनर घरच्याघरीच तयार करणे अतिशय सोपे आहे. ग्रीन टी टोनर घरच्याघरीच तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, १ टेबलस्पून ग्रीन टी, ७ ते ८ गुलाबाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून कलोंजी व ग्लिसरीन इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

घरीच करा औषधी पानाफुलांचे टोनर! केसांची खुंटलेली वाढ होईल दुप्पट वेगाने - स्वस्तात मस्त उपाय...

गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

एक मोठं भांडं घेऊन त्यात पाणी ओतून घ्यावे. पाण्यांत ग्रीन टी, गुलाबाच्या पाकळ्या, कलोंजी व ग्लिसरीन असं सगळं साहित्य एकत्रित करुन २ ते ३ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण मध्यम आचेवर उकळून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या. नंतर ते गाळून घ्या आणि एका स्प्रे बोतलीत भरून ठेवा. 

त्वचेसाठी टोनर वापरण्याची पद्धत :- 

दिवसातून ३ ते ४ वेळा चेहऱ्यावर हे टोनर स्प्रे करा. टोनर नैसर्गिकरित्या वाळू द्या, पुसून टाकू नका. तुम्ही टोनर कापसाच्या मदतीने देखील त्वचेवर लावू शकता.

त्वचेसाठी हे ग्रीन टी टोनर वापरण्याचे फायदे... 

१. ग्रीन टी टोनर वापरल्यामुळे त्वचेवरील ओपन पोर्स लहान होण्यास मदत होते.

२. त्वचा आतून खोलवर स्वच्छ केली जाते यामुळे आपली त्वचा कायम फ्रेश आणि टवटवीत दिसते. 

३. चेहऱ्यावरील चिकटपणा कमी होतो आणि त्वचेला चिकटलेली धूळ, माती, धूलिकण त्वचेवरुन काढून टाकण्यास मदत होते. 

४. नियमित वापर केल्यास नैसर्गिक ग्रीन टी टोनर त्वचेला आरोग्यदायी आणि निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते.

Web Title: green tea for open pores how to use green tea for skin pores home remedies for open pores natural toner for open pores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.