>ब्यूटी > चेहऱ्यावर ग्लो हवाय? -मग केळीची साल फेकू नका, त्यात जादू आहे !

चेहऱ्यावर ग्लो हवाय? -मग केळीची साल फेकू नका, त्यात जादू आहे !

त्वचा चमकदार हवी, स्वच्छ दिसायला हवी तर घरात आणलेली केळी तुमच्यासाठी जादूची कांडी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:50 PM2021-03-04T16:50:56+5:302021-03-05T17:48:51+5:30

त्वचा चमकदार हवी, स्वच्छ दिसायला हवी तर घरात आणलेली केळी तुमच्यासाठी जादूची कांडी आहे.

Glow on the face? -Then don't throw away the banana peel, it has magic in it! | चेहऱ्यावर ग्लो हवाय? -मग केळीची साल फेकू नका, त्यात जादू आहे !

चेहऱ्यावर ग्लो हवाय? -मग केळीची साल फेकू नका, त्यात जादू आहे !

Next
Highlightsचेहऱ्यावरच्या मृत त्वचेमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो.केळाच्या उपयोगानं अतिशय हळुवारपणे ही मृत त्वचा निघून जावू शकते.चेहरा ताजा टवटवीतही हवा असेल तर केळीची सालंही त्यासाठी पुरतात.

- निर्मला शेट्टी

केळी. साधंसं फळ. मात्र तुम्हाला सुंदर त्वचा हवी, चकाकी हवी तर ही केळी तुमच्या चेहऱ्या वर जादू करु शकते. केळी खाऊनही आणि न खाताही. केळीची ही जादू अगदी सहज सोपी तुमच्याही हातात येऊ शकते.मात्र त्यासाठी त्यातलं लॉजिकही जरा आधी समजून घेऊ.

त्वचेसाठी केळं उपयुक्त असलं तरी त्वचेच्या प्रकाराप्रमाणे आणि त्वचेच्या समस्येप्रमाणे केळाबरोबर वापरायचे घटक ठरवावे लागतात. आणि म्हणूनच केळाचा उपयोग सरसकट न करता आपल्या त्वचेचा प्रकार आणि पोत समजून करावा म्हणजे केळं वापरल्यानं मिळणारा फायदा आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळतो.

सेंसेटिव्ह त्वचेसाठी एक केळं + थोडे ओट्स

अतिसंवेदनशील त्वचेसाठी केळाचा उपयोग करतांना पिकलेलं अर्ध केळं घ्यावं. पाव कप ओट्स , एक चमचा मध आणि एक चमचा दूध किंवा दही घ्यावं. हे सर्व मिक्सरध्ये वाटून एकजीव करून घ्यावं. तयार झालेली मऊ पेस्ट     चेहऱ्याला लावावी. ती दहा मिनिटं तशीच ठेवावी.  नंतर थंड पाण्यात थोडं गुलाब पाणी टाकून त्या पाण्यानं चेहरा धुवावा.  केळाच्या या पॅकमुळे चेहरा काही क्षणात स्वच्छ आणि मऊ-मुलायम होतो.
 

 

त्वचा कोरडी आहे? केळं-पपई-बदाम

कोरडय़ा आणि रूक्ष त्वचेसाठी केळाचा पॅक बनवणं अगदी सोपं आहे.

 पिकलेलं पाव केळं, पिकलेल्या पपईची एक मोठी फोड, दोन चमचे दही, दोन किंवा तीन भिजवलेले बदाम आणि दोन चमचे ग्लिसरीन घ्यावं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून एकत्र करावं.  ही पेस्ट चेहऱ्या ला आणि मानेला लावावी.  दहा मिनिटानंतर थोडं दूध घेवून त्यानं चेहरा धुवावा. आणि नंतर साध्या आणि थंड पाण्यानं चेहरा धुवावा.   

 

डेड स्किन आहे? - तांदुळ आणि केळं

चेहऱ्या वरच्या मृत त्वचेमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. ही मृत त्वचा  फार घासघूस करत काढण्याची गरज नसते. केळाच्या उपयोगानं अतिशय हळुवारपणे ही मृत त्वचा निघून जावू शकते. यासाठी पिकलेलं अर्ध केळं , चार बदाम, आणि दोन चमचे तांदूळ (धुवून आणि नंतर सुकवून घेतलेले) घ्यावे. हे सर्व एकत्र वाटून घेवून त्याची मऊसर पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्या ला हळुवारपणो मसाज करत लावावी. थोड्या वेळानं थोडं ताक घेवून चेहरा धुवावा आणि नंतर साध्या थंड पाण्यानं चेहरा धुवावा. 

तुकतुकीत पाठ हवी?- केळं आणि चंदन पावडर

चेहऱ्या सोबत पाठही छान मुख्य म्हणजे दिसावी अशी अनेकींची इच्छा. ही इच्छा केळाचा वापर करून सहज पूर्ण होवू शकते. यासाठी दोन केळी, पाव कप बदामाचं तेल, दोन चमचे मध, दोन चमचे चंदनाची पावडर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यावं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगलं एकत्र करून घ्यावं. तयार झालेला लेप मसाज करत रगडून लावावा. हा लेप चांगला सुकला की थोडं दूध घेवून चेहरा धुवावा आणि नंतर साध्या थंड पाण्यानं चेहरा धुवावा.  

 एवढं केलं तरी पाठ खात्रीनं तुकतुकीत होते.

टवटवीत चेहरा हवा? - मग केळीचं साल फेकू नका.
 

 

खूपच घाईची वेळ असेल. चेहरा ताजा टवटवीतही हवा असेल पण साधा लेप करून लावण्याइतकाही हातात वेळ नसेल तर त्यासाठी खूप काही शोधाशोध करायची गरज नसते.  केळीची सालंही त्यासाठी पुरतात. पिकलेल्या केळाची साल घ्यायची आणि ती चेहऱ्याला घासून लावायची. एक दहा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं त्वचेला आराम मिळतो आणि चेहराही मस्त टवटवीत होतो.   

 

(लेखिका सौंदर्यतज्ञ आहेत.)

nirmala.shetty@gmail.com
 

Web Title: Glow on the face? -Then don't throw away the banana peel, it has magic in it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं? - Marathi News | being beautiful! -what is beautiful? what is beauty? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

टीनएजर होता होता ‘सौंदर्य’ नावाची चेटकीण कधी  मानेवर बसली आणि कधी तिनं आपल्या संपूर्ण आयुष्याचा तिने ताबा घेतला हे समजलंही नाही.. ती सुंदर दिसण्याची गोष्ट. ...

मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर? - Marathi News | Skin Care tips : How to identify makeup products is Damage or good | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर?

Beauty Tips in Marathi : मास्कमुळे अर्धा चेहरा झाकला जातोय? ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात,  मास्क लावूनही आकर्षक दिसण्याचा सोपा फंडा ...

मेकअपचं साहित्य, कॉस्मेटिक्स यांनाही एक्सपायरी डेट असते हे माहिती आहे का? - Marathi News | know the makeup products and cosmetics side effects and way of use properly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेकअपचं साहित्य, कॉस्मेटिक्स यांनाही एक्सपायरी डेट असते हे माहिती आहे का?

Beauty Tips : लॉकडाऊनमुळे मेकअपच्या सामानाला आराम दिलाय? आवडते ब्युटी प्रोडक्टस खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' टिप्स ...

कोण म्हणतं टिकली म्हणजे काकूबाई? मॅचिंग टिकलीचा नवा ठसठशीत ट्रेण्ड - Marathi News | Matching Bindi-piku- deepika padukone- Anushka sharma- new trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं टिकली म्हणजे काकूबाई? मॅचिंग टिकलीचा नवा ठसठशीत ट्रेण्ड

'पिकू'तली दीपीका पडूकोण आठवा, तिचा प्रोफेशनल लूक, मोठी टिकली हे सारं अतिशय सुंदर होतं. एकेकाळचा रेट्रो मॅचिंग टिकली ट्रेण्ड आता परत येतो आहे. ...

एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट ! - Marathi News | style hacks - loose t shirt can change your look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

घरुन काम करताना गबाळंच राहिलं पाहिजे, असं थोडंच आहे, आपण आपल्याला सुंदर दिसलो पाहिजे.. ...

स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल! - Marathi News | stress and hair loss can be related, treat it. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेसचा आणि केस गळण्याचा काय संबंध? असं म्हणून दुर्लक्ष कराल तर पस्तावाल!

आपल्या मेंदूला विश्रांतीच नाही. काय महत्वाचं काय गरजेचं नाही हे तो कसं ठरवणार? असा अस्थिर मेंदू आपल्याला तरी कशी शांत झोप येऊ देईल? ...