अगदी रोजच्या रोज आपलं आपल्या त्वचेकडे लक्ष देणं होत नाही. तरुण वयात त्वचेकडे लक्ष देण्याची काय गरज आहे, असा अनेकजणींचा भ्रमही असतो. त्यामुळे पंचविशीच्या आतबाहेर असणाऱ्या महिला त्वचेची विशेष काळजी घेत नाहीत. याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि मग पंचविशी ओलांडताच डोळ्यांखाली बारीक सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. तेव्हा मग अचानक आपण खडबडून जागे होतो आणि त्वचेच्या बाबतीत खूपच कॉन्शस होतो (use of ghee to reduce wrinkles). असं होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच त्वचेची योग्य ती काळजी घ्यायला हवी (ghee face mask for glowing skin). अगदी पंचविशीत असतानाच आपण काही उपाय नियमितपणे केले तर कमी वयातच त्वचेवर येणाऱ्या बारीक सुरकुत्या टाळल्या जाऊ शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.(how to use ghee for young and radiant glowing skin?)
त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या टाळण्यासाठी तुपाचा फेसमास्क
आपल्या डोळ्यांच्या आसपासची जी जागा असते तिथे सगळ्यात आधी बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. त्या दिसताच पुढे सांगितलेला एक उपाय त्वरीत करायला हवा अशी माहिती ब्यूटी एक्सपर्टनी drmanojdasjaipur या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
फॅब्रिकचा सोफा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती- दिवाळीची साफसफाई होईल अगदी झटपट
यामध्ये ते सांगतात की त्वचेवर कमी वयात सुरकुत्या येऊ द्यायच्य नसतील किंवा आल्या असतील तरीही लगेच त्या घालवायच्या असतील तर तूप खूप उपयोगी ठरते. हे तूप जरी घरी तयार केलेले असेल तर अधिक उत्तम. कारण तुपामध्ये असणारे काही घटक त्वचेमधलं मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करतात.
हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा तूप घ्या. त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये लॅक्टीक ॲसिड आणि काही हेल्दी फॅट्स असतात जे त्वचेचे पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
दिवाळीत लेकीसाठी शिवून घ्या सुंदर परकर- पोलकं! पारंपरिक कपड्यांत लेक दिसेल गोजिरी
त्वचेचं पीएच संतुलित राहिलं तर त्वचेमधलं पाणी आणि तेल यांचं प्रमाणही संतुलित राहातं आणि त्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्सचा त्रास होत नाही.
आता या मिश्रणात अर्धा चमचा तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठही त्वचेसाठी अतिशय उत्तम असतं. आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि हा फेसमास्क चेहऱ्याला लावा.
केस गळणं किंवा कोंडा, समस्या कोणतीही असो केसांच्या सर्व समस्यांवर ‘हा’ एकच उपाय- त्रासच संपतील कायमच
साधारण २० ते २५ मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने चेहरा चोळून धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर त्वचा मॉईश्चराईज करा. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.
Web Summary : After 25, use a ghee face mask to reduce wrinkles. Mix ghee, yogurt, and rice flour. Apply for 20 minutes, then rinse. This keeps skin moisturized and balanced, preventing problems like pimples. Repeat weekly for radiant skin.
Web Summary : 25 के बाद झुर्रियाँ कम करने के लिए घी का फेस मास्क इस्तेमाल करें। घी, दही और चावल का आटा मिलाएं। 20 मिनट के लिए लगाएं, फिर धो लें। इससे त्वचा मॉइस्चराइज़ और संतुलित रहती है, और पिंपल्स जैसी समस्याएं नहीं होती। चमकदार त्वचा के लिए इसे हर हफ्ते दोहराएं।