Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > फक्त ५ मिनिटं चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती उटणं-लग्न असो की पार्टी-ऑफिस असो की किटी-चेहऱ्यावर फ्रेश चमक

फक्त ५ मिनिटं चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती उटणं-लग्न असो की पार्टी-ऑफिस असो की किटी-चेहऱ्यावर फ्रेश चमक

Ubtan for Summer Tan Removal: Homemade Face Mask for Instant Freshness: Ayurvedic Ubtan for Fair Skin: पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी चेहऱ्याला उटणं कसं लावावं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 13:01 IST2026-03-09T12:59:38+5:302026-03-09T13:01:36+5:30

Ubtan for Summer Tan Removal: Homemade Face Mask for Instant Freshness: Ayurvedic Ubtan for Fair Skin: पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी चेहऱ्याला उटणं कसं लावावं पाहूया.

Gharghuti Ubtan for Face Chehryasathi Gharguti Upay Homemade Ubtan for Glowing Skin Instant Face Glow Home Remedy Natural Face Pack for Wedding Season Get Radiant Skin in 5 Minutes | फक्त ५ मिनिटं चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती उटणं-लग्न असो की पार्टी-ऑफिस असो की किटी-चेहऱ्यावर फ्रेश चमक

फक्त ५ मिनिटं चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती उटणं-लग्न असो की पार्टी-ऑफिस असो की किटी-चेहऱ्यावर फ्रेश चमक

लग्नसमारंभ आणि उन्हाळा सुरु झाला की आपल्याला सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते आपल्या त्वचेचं. लग्नाचा सीझन असो किंवा एखादी खास पार्टी, आपल्या आपला चेहरा तजेलदार आणि तेजस्वी दिसावा असं वाटतं.(Ubtan for Summer Tan Removal) कडक उन्हामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेवर काळपटपणा येतो, त्वचा निस्तेज होणं किंवा चेहऱ्यावर काळे डाग पडणं या समस्यांना सामोरे जावे लागते.(Skincare Tips for Office Going Women) अनेकदा इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि महागड्या फेशियलवर हजारो रुपये खर्च करतो. या केमिकल ट्रिटमेंट्समुळे तात्पुरता ग्लो मिळतो. पण त्वचेचे अधिक नुकसान होते. (Natural Glow for Kitty Parties)
फार पूर्वीपासून आजीच्या काळात असलेले घरगुती उपाय आपल्या त्वचेला ग्लो करण्यास मदत करतात. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे काही घटक कोणत्याही महागड्या क्रीमरपेक्षा जास्त प्रभावी ठरतात.(5 Minute Face Mask Marathi) फक्त ५ मिनिटं हे उटण चेहऱ्यावर लावल्यास उन्हामुळे झालेली टॅनिंग निघून जाते आणि त्वचेला आतून पोषण मिळते. पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी चेहऱ्याला उटणं कसं लावावं पाहूया. 

केमिकलला करा बाय-बाय; घरीच करा नैसर्गिक सनस्क्रीन! तेलात मिसळा ५ पदार्थ - महागडी क्रीम मिनिटांत तयार

1. हळद आणि दह्याचे उटणं हे त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. हळदीत असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म ब्लॅकहेड्स आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात. हळद आणि दह्याचा स्क्रब बनवण्यासाठी १ चमचा हळद आणि २ चमचे दह्याचे मिश्रण करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. हे स्क्रब आपल्या त्वचेचा रंग उजळवण्यास आणि चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. 

2. चंदन आणि दुधाची पेस्ट. चंदन हे आपल्या त्वचेला आराम देते आणि डाग कमी करण्यास मदत करते. चंदन आणि दुधाचे स्क्रब बनवण्यासाठी १ चमचा चंदन पावडर दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर धुवा. यामुळे त्वचा थंड होण्यास मदत होईल. 

3. बेसन आणि दुधाची पेस्टचा उपाय मागच्या अनेक काळांपासून केला जातं आहे. बेसन आणि दुधाचे स्क्रब बनवण्यासाठी २ चमचे बेसन थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा, नंतर कोरडे होऊ द्या. थंड पाण्याने चेहरा धुवा. हे स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्वचेला एक्सफोलिएशन करते. 

4. जर आपली त्वचा खूप तेलकट असेल तर कच्च्या दुधाऐवजी गुलाबाचा वापर करा. आणि जर त्वचा कोरडी असेल तर उटण्यामध्ये अर्धा चमचा मध किंवा साय घाला. हे उटण लावल्यानंतर चेहरा धुताना साबणाचा वापर करू नका, जेणेकरून नैसर्गिक घटकांचा परिणाम दीर्घकाळ टिकेल. चेहऱ्यावर काही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. 

Web Title : 5 मिनट में पाएं निखरी त्वचा: घर पर बनाएं उबटन, शादी हो या पार्टी!

Web Summary : घर पर उबटन बनाकर पाएं दमकती त्वचा! हल्दी, दही, चंदन, बेसन और दूध जैसे रसोई के सामानों का उपयोग करके टैन और सुस्ती से लड़ें। प्राकृतिक चमक के लिए इन आसान चरणों का पालन करें।

Web Title : 5-Minute Homemade Ubtan for Glowing Skin: Wedding, Party Ready!

Web Summary : Get radiant skin with a quick homemade ubtan! Combat tan and dullness using kitchen ingredients like turmeric, yogurt, sandalwood, besan, and milk. Follow these easy steps for a natural glow.