Join us

व्हेलेंटाईन्स डेला दिसायचंय स्पेशल? वापरा हे ३ घरगुती नॅचरल फेसपॅक, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 14:21 IST

How To Get Glowing Skin On Valentine Day By Applying Natural Ingredients : skincare hacks to glow this valentine's day : Skincare Face Pack For Perfect Valentine's Day Look : Get Glowing Skin this Valentine's Day with Simple Homemade Fcae Pack : घरच्याघरीच फक्त ३ नैसर्गिक पदार्थ वापरून करा फेसपॅक, व्हेलेंटाईन्स डेला दिसाल खास...

सध्या व्हेलेंटाईन्स वीक सुरु आहे. संपूर्ण जगभरात हा 'व्हेलेंटाईन्स डे' हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. 'व्हेलेंटाईन्स डे' हा प्रेमी कपल्सचा खास दिवस असतो. या दिवशी कपल्स आपल्या जोडीदारावरील प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करतात. अशा या खास दिवशी आपण नेहमीपेक्षा खूप स्पेशल आणि विशेष दिसावे अशी प्रत्येकीची इच्छा असते(Get Glowing Skin this Valentine's Day with Simple Homemade Fcae Pack).

या खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी पार्लर गाठतात, परंतु काहीवेळा आपल्याला पार्लर जाणे शक्य होत नाही. एवढेच नाही तर प्रत्येकवेळी पार्लरच्या या महागड्या ट्रिटमेंट्स खिशाला परवडतीलच (How To Get Glowing Skin On Valentine Day By Applying Natural Ingredients) असे नाही. त्यामुळे 'व्हेलेंटाईन्स डे' (Skincare Face Pack For Perfect Valentine's Day Look) सारख्या खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी आपण घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन कसे सुंदर दिसू शकतो ते पाहूयात. घरच्याघरीच फक्त ३ नैसर्गिक पदार्थांचा वापर करून फेसपॅक तयार करण्याची सोपी पद्धत... 

१. चंदन फेसपॅक :- फार पूर्वीपासून शतकानुशतके त्वचेसाठी चंदनाचा वापर केला जातो आणि आजही केला जातो. चंदनामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे महत्वाचे घटक असतात, याचबरोबर दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेला थंड करण्यास, रंग सुधारण्यास आणि मुरुमांच्या समस्या कमी करण्यास तसेच डाग हलके करण्यास मदत करतात. हा चंदनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी, एका बाऊलमध्ये १ चमचा चंदन पावडर, आवश्यकतेनुसार गुलाब पाणी आणि एक चमचा खोबरेल तेल घालून चांगले मिसळून घ्यावे. तयार केलेला फेसपॅक १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि मग १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

२. तांदूळ पिठाचा फेसपॅक :- तांदुळाचे पीठ फक्त आपली त्वचा एक्सफोलिएट करत नाही तर रंग देखील सुधारते. तसेच, जर तुम्ही तांदळाच्या पिठापासून बनवलेला फेसपॅक वापरला तर यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास, छिद्र साफ करण्यास आणि डाग हलके करण्यास देखील मदत करते. एका बाऊलमध्ये २ चमचे तांदुळाचे पीठ, १ चमचा एलोवेरा जेल, ४ चमचे कच्चे दूध घेऊन सगळे जिन्नस एकत्रित मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात २ ते ३ थेंब बदाम तेल देखील मिसळू शकता. आता हे सर्व पदार्थ चांगले मिसळा आणि एकदम पातळ अशी पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

३. मुलतानी मातीचा फेसपॅक :- मुलतानी माती चेहऱ्यावरील छिद्रे साफ करण्यासाठी आणि त्यांचा आकार कमी करण्यासाठी फायदेशीर असते. जर तुमची त्वचा असमान असेल तर ती बरी होण्यास देखील मदत होते. म्हणून, मुलतानी मातीपासून बनवलेले फेसपॅक त्वचेसाठी उपयोगी मानले जातात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे मुलतानी माती, १ चमचा बेसन आणि २ चमचे दही घ्यावे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून फेसपॅक तयार करून घ्यावा. तयार केलेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीकहोम रेमेडी