'लालचुटुक टोमॅटो' हा फक्त पदार्थ तयार करण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील वापरु शकतो. व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण टोमॅटोमध्ये आढळून येते. टोमॅटो (Get Glowing Skin At Home With Tomato Facial, Here Is A Step By Step Guide) हा क्लिजिंग एजंट म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे टोमॅटो हा एक सर्वोत्तम ॲण्टी एजिंग रोखणारा पदार्थ म्हणून मानला जातो. एखाद्या पदार्थामध्ये जसे टोमॅटो घातला की त्याची चव आणि गुणवत्ता अधिक वाढते त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचे (How to do tomato facial at home : 4 easy steps tomato facial at home) सौंदर्य जपण्यासाठी देखील टोमॅटोचा वापर केला जातो(4 easy steps tomato facial at home).
थंडीच्या दिवसांत त्वचेच्या अनेक समस्या सतावतात. त्वचा कोरडी पडणे, त्वचेतील ओलावा कमी होणे, त्वचा रुक्ष -कोरडी निस्तेज दिसू लागणे. अशावेळी आपण त्वचा आधीसारखी होती तशीच करण्यासाठी पार्लरमध्ये (Best Tomato Facial at Home for Glowing Skin) जाऊन हजारो रुपये खर्च करतो. परंतु काहीवेळा असे अनेक महागडे उपाय करण्यापेक्षा एकच साधा घरगुती उपाय पुरेसा असतो. हिवाळ्यातील त्वचेच्या अनेक समस्या कायमसाठी दूर करून त्वचा अधिक सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी आपण रोजच्या वापरातील 'लालचुटुक टोमॅटोचा' वापर करु शकतो. घरच्याघरीच टोमॅटो वापरुन ४ सोप्या स्टेप्समध्ये 'टोमॅटो फेशियल' कसे करायचे ते पाहूयात.
'टोमॅटो फेशियल' कसे करावे याच्या ४ स्टेप्स...
त्वचेवरील टॅनिंग दूर करुन त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्ही सोप्या ४ स्टेप्समध्ये घरच्याघरीच टोमॅटो फेशियल करु शकता. टोमॅटोने फेशियल करणे खूप सोपे आहे आणि त्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. टोमॅटो फेशियल पूर्णपणे नैसर्गिक आहे, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकते. टोमॅटोने फेशियल करण्याच्या पद्धती जाणून घेऊया.
व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल 'या' ५ पदार्थात मिसळून लावा, केसांच्या समस्या होतील दूर- केस दिसतील चमकदार...
१. क्लिंजिंग :- सर्वप्रथम, चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. दोन चमचे ताज्या टोमॅटो प्युरीमध्ये थोडासा मध मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा आणि ८ ते १० मिनिटांनी कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करा.
२. स्क्रबिंग :- टोमॅटो प्युरीमध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळून स्क्रब तयार करा. ४ ते ५ मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होईल.
पार्लर कशाला ? चक्क फुगे वापरुन केस करा परफेक्ट कुरुळे, पार्लर सारखा महागडा लुक्स घरच्याघरीच...
३. फेसमसाज :- एक चमचा टोमॅटोच्या रसात एक चमचा दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढेल.
४. फेसपॅक :- टोमॅटो प्युरीमध्ये दूध आणि कॉफी पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि चेहरा आणि मानेला लावा. २० ते ३० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
यानंतर त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करा आणि बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका.