Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 15:20 IST

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिचा काळ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच हिट झाला आहे. तिच्या साडीपासून ते नोजपीनपर्यंत सगळ्याचीच जबरदस्त चर्चा आहे.

ठळक मुद्देजेनेलियाचे फोटो पाहिल्यानंतर अशी साडी, ब्लाऊज आणि नोजपीन  मिळविण्यासाठी नक्कीच अनेक जणी अनेक दुकाने आणि शॉपिंग साईट्स शोधतील, यात वादच नाही.  

रितेश देशमुखशी लग्न करून महाराष्ट्राची सुनबाई झालेली अभिनेत्री जेनेलिया डिसुझा सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. 'तुझे मेरी कसम...' या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर त्याचं सूत जुळलं आणि आज बॉलीवूडमधलं एक आदर्श जोडपं म्हणून रितेश- जेनेलिया यांच्याकडे पाहिलं जातं. दोघे नवरा- बायको सोशल मिडियावर चांगलेच ॲक्टीव्ह असतात. त्यांचे अनेक रिल्स तर लाखो लाईक्स मिळवतात. त्यांचे अनेक चाहते या रिल्सची वाट बघत असतात. सध्या जेनेलियाचे काही फोटो नेटिझन्सचं आणि स्पेशल तरूणी आणि महिलांचं जबरदस्त ॲट्रॅक्शन ओढून घेत आहेत. असं नेमकं आहे तरी काय या फोटोंमधे?

 

दिवाळीच्या काळात अनेक अभिनेत्रींनी त्यांचे फेस्टिव्ह लूकचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे अनेक जणींनी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची स्टाईल फॉलो केली आणि एकदम भारी लूक केला होता. दिवाळी संपली असली तरी लग्नसराई अजून बाकी आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या किंवा नातलगांच्या लग्नात तुम्हाला जर काही हटके स्टाईल करायची असेल तर जेनेलियाचे हे साडीतले फोटो नक्की पहा. काळ्या साडीत बहरून आलेलं जेनेलियाचं सौंदर्य नेटकऱ्यांना वेड लावणारं ठरलं आहे.

 

जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच तिचे एथनिक लूकमधले काही फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाची साडी आणि तिच्यावर पिवळट केशरी रंगाचे डिझायनर ब्लाऊज असा जेनेलियाचा हटके लूक झाला आहे. केसांचा तिने एक मोठा बन बांधला असून नाकातली मोराची नोजपीन आणि कानातले मोठे- मोठे झुमके जेनेलियाच्या सौंदर्याला चार चाँद लावणारे ठरले आहेत. who wore what when या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली असून साडीची किंमत तब्बल ४० हजार आहे, असे सांगितले जाते. मदुराई सिल्क प्रकारातली ही साडी आहे. साडीचा रंग काळा असून साडीवर सोनेरी, चंदेरी रंगाने आडव्या रेघांमध्ये विणकाम केले आहे. साडीचा काठ मरून रंगाचा असून त्यावरही हिरवा, पिवळा, केशरी, लाल रंगाने वर्क केले आहे.

 

जेनेलियाने नेसलेली साडी तर सुंदर आहेच. पण या साडीचे सौंदर्य आणखी वाढविण्याचे काम केले आहे ते तिच्या डिझायनर ब्लाऊजने. ब्लाऊज आणि साडी दोन्हीही रंग एकमेकांना कॉन्ट्रास्ट आहेत. ब्लाऊजवर छोटे छोटे आरसे लावून बारीक काम करण्यात आलं आहे. जेनेलियाने या साडीवर ऑक्सिडाईज झुमके आणि ऑक्सिडाईज नोजपीन घातली आहे. झुमके अतिशय मोठे असून जवळपास खांद्यापर्यंत रेंगाळणारे आहेत. झुमके एवढे मोठे असल्याने गळ्यात तिने काहीही घातलेलं नाही. या सगळ्यात तेवढीच खास ठरली आहे तिची एवढीशी नोजपीन. माेराच्या आकाराची असणारी ही नोजपीन अतिशय आकर्षक रंगांनी सजविण्यात आली आहे. जेनेलियाचे फोटो पाहिल्यानंतर अशी साडी, ब्लाऊज आणि नोजपीन  मिळविण्यासाठी नक्कीच अनेक जणी अनेक दुकाने आणि शॉपिंग साईट्स शोधतील, यात वादच नाही.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससोशल व्हायरलजेनेलिया डिसूजासेलिब्रिटीइन्स्टाग्राम