अनेकांना समोरच्या बाजूला टक्कल नसतानासुद्धा विरळ केसांमुळे टक्कल असल्यासारखे वाटते. (Forehead looks so big that it looks like baldness, do 4 hairstyles - you will look beautiful every day, haircare tips )कपाळाच्या जवळच्या भागात टक्कल दिसू लागल्यास आत्मविश्वास कमी होतो. विरळ केस असल्यावर योग्य प्रकारे केस बांधले तर विरळ भाग सहजपणे लपवता येतो. केस बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास टक्कल दिसणार नाही आणि चेहराही एकदम आकर्षक दिसेल.
केसांचा भांग कुठे पाडावा याचा नीट विचार केला पाहिजे. मधोमध भांग पाडण्याऐवजी जरा बाजूला भांग पाडल्यास कपाळावरील केसांचा विरळपणा सहज लपवता येतो. साईड पार्टिशनमुळे केसांची घनता कमी असली तरी टक्कल दिसत नाही. ती जागा आरामात लपते. केस घट्ट बांधू नका. अत्यंत घट्ट पोनीटेल किंवा वेणीमुळे केस खेचले जातात. त्यामुळे केस मागे सरकतात आणि समोर टक्कल वाढते. तसेच केस गळायलाही लागतात. त्यामुळे केस कायम सैलसर बांधायचे.
जर केस फारच विरळ असतील, तर 'पफ' किंवा 'बंप' स्टाईलचा वापर करता येतो. हेअर बंपरच्या सहाय्याने समोरच्या भागा थोडा फुगवटा तयार केला तर केस भरगच्च वाटतात. अशा स्टाईल्समुळे कपाळ झाकलं जातं. याशिवाय, फ्रिंजेस किंवा लेयर कटसारखे हेअरकट करावेत. पुढचा विरळ केसांचा भाग झाकता येतो. लांब आणि सरळ फ्रिंजेस ऐवजी थोडेसे सॉफ्ट कर्व्ह्स असलेले लेयर्स निवडल्यास ते अधिक नैसर्गिक आणि सुंदर दिसतात.
हायपोनी आणि बनाना क्लिप वगैरे लावून केलेल्या हेअरस्टाईल टाळा. केस विरळ असतील तर अशा हेअरस्टाईल्समुळे ते जास्त विरळ दिसतात. मानेलगत सैलसर पोनी बांधा. तसेच साधी क्लिप वापरा. ज्यामधे केसांचा भांग पडणार नाही. तसेच सतत केस सुटे ठेवणे टाळा. केस सुटे ठेवल्यावर विरळपणा दिसत नाही मात्र सतत केस सुटे ठेवल्यामुळे ते गळतात आणि गुंततात.
केस स्वच्छ आणि मोकळे ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. केसांमध्ये नेहमी जास्त तेल, जेल किंवा स्प्रे यांचा वापर केल्यास ते चिकट होतात आणि विरळपणा अधिक स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे केसांसाठी योग्य असलेला शॅम्पू आणि कंडिशनर वापरून केसांची चांगली काळजी घ्या. या साध्या पण प्रभावी गोष्टी लक्षात घेतल्यास विरळ केसांमुळे समोर टक्कल दिसण्याची भीती दूर होईल. आणि केस बांधताना सैल बांधणे फायद्याचे ठरेल.