Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाळ मोठं दिसतं-केस गळतात? चमचाभर मेथी दाण्याचं पाणी ‘असं’ लावा-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:38 IST

Fenugreek Seeds Water For Hair Growth : मेथीचं पाणी घरच्याघरी तयार करणं सोपं आहे. या पाण्याचा केसांवर सकारात्मक परिणाम होतो.

मेथीचे पाणी शरीराच्या बऱ्याच समस्यांसाठी गुणकारी ठरते.  सौंदर्याच्या दृष्टीनं मेथीचे अनेक फायदे आहेत. मेथीचा वापर करून तुम्ही एक जादूई उपाय करू शकता. मेथी आपल्या किचनमधला एका उत्तम पदार्थ आहे. अनेक  वर्षांपासून आयुर्वेदात मेथीचा वापर केसांच्या उत्पादनांसाठी केला जात आहे. मेथीच्या वापरानं केस मजबूत  होतात आणि चमक येण्यास मदत होते. मेथीचं पाणी घरच्याघरी तयार करणं सोपं आहे. या पाण्याचा केसांवर सकारात्मक परिणाम होतो. रोज हा उपाय केल्यास महिन्याभरानंतर केसांची वाढ झालेली दिसून येईल. (Fenugreek Seeds Water For Hair Growth)

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. यात प्रोटीन्स, व्हिटामीन्स, आयर्न, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. आयुर्वेदानुसार मेथी केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आवश्यक असते.  हे पाणी केसांवर स्प्रे करून १० मिनिटं मसाज करा नंतर केस स्वच्छ धुवा. (How To Use Fenugreek Seeds For Hairs)

मेथीमध्ये निकोटिनिक एसिड असते जे केसांची मुळं मजबूत बनवते आणि केस गळणं थांबवते. यात प्रोटीन असते ज्यामुळे केस दाट होतात. मेथीतील एंटी फंगल गुण स्काल्पमधून खाज, कोंडा कमी करतात. केसांना नवीन चमक मिळण्यासही मदत होते. कारण यात व्हिटामीन ए आणि सी असते ज्यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात. यातील आयर्न आणि पोटॅशियम ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवण्यास मदत करते. केमिकल्सशिवाय केस सॉफ्ट आणि मॅनेजेबल होण्यास मदत होते. (Ref)

मेथीचं पाणी तयार करणं खूप सोपं आहे. रात्री झोपण्याआधी २ चमचे मेथीचे दाणे घ्या. हे दाणे धुवून नंतर  १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठून हे दाणे गाळून पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि  केसांवर फवारा. आठवड्यातून २ ते ३ वेळा शॅम्पूनं केस धुण्याआधी या पाण्यानं केस धुवा.

१५ ते २० मिनिटं मसाज केल्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवा. यामुळे स्काल्प क्लिन राहण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात. मेथीच्या पाण्यात १ चमचा नारळाचं तेल मिसळून पेस्ट तयार करा.  ही पेस्ट स्काल्पवर लावा ३० मिनिटं तसंच ठेवून केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून केस धुतल्यानंतर केसांची वाढ चांगली होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Fenugreek water for hair growth: Thicker, stronger hair naturally.

Web Summary : Fenugreek water promotes hair growth, strengthens roots, and reduces hair fall. Rich in proteins and vitamins, it eliminates dandruff, adds shine, and improves scalp health. Regular use results in thicker, softer, and more manageable hair, promoting overall hair vitality.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी