पायाचे घोटे काळेकुट्ट झालेत, घट्टे पडलेत? काळपटपणा कमी करण्यासाठी हे उपाय... - Marathi News | feet care tips : home remedies for ankle care | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > पायाचे घोटे काळेकुट्ट झालेत, घट्टे पडलेत? काळपटपणा कमी करण्यासाठी हे उपाय...

पायाचे घोटे काळेकुट्ट झालेत, घट्टे पडलेत? काळपटपणा कमी करण्यासाठी हे उपाय...

चेहरा, हात आणि मान यांची काळजी घेतली की झालं... पायाकडे आपण फार काही लक्ष देत नाही. पण यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम होतो. खडबडीत झालेले पाय आणि काळेकुट्ट झालेले पायाचे घोटे मग कधीतरी सगळ्यांसमोर चांगलीच लाज आणतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 03:23 PM2021-07-20T15:23:59+5:302021-07-20T16:35:25+5:30

चेहरा, हात आणि मान यांची काळजी घेतली की झालं... पायाकडे आपण फार काही लक्ष देत नाही. पण यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम होतो. खडबडीत झालेले पाय आणि काळेकुट्ट झालेले पायाचे घोटे मग कधीतरी सगळ्यांसमोर चांगलीच लाज आणतात.

feet care tips : home remedies for ankle care | पायाचे घोटे काळेकुट्ट झालेत, घट्टे पडलेत? काळपटपणा कमी करण्यासाठी हे उपाय...

पायाचे घोटे काळेकुट्ट झालेत, घट्टे पडलेत? काळपटपणा कमी करण्यासाठी हे उपाय...

Next
Highlightsपायाच्या घोट्याप्रमाणे अनेक जणांचे हाताचे कोपरेही काळवंडलेले असतात. त्यामुळे हे सगळे उपाय हाताच्या कोपऱ्यासाठी केले, तरी निश्चितच फायदेशीर ठरतात. 

पायाचे घोटे काळे पडण्याची समस्या अनेकींसाठी डोकेदुखी ठरते. हे घोटे जर वेळीच स्वच्छ केले नाहीत, तर जसजसे वय वाढते, तसतशी घोट्याची त्वचा अधिकच काळवंडत जाते आणि मग ती कायमसाठी तशीच राहते. काही काही जणांचे तर घोटे काळे पडून तेथील त्वचा अतिशय शुष्क होऊन जाते आणि दिवसेंदिवस त्याच्यावर घाण बसून ती जाडसर होते. पायाला पडलेले हे घट्टे सगळ्यांसमोर उघडे पडले तर खूपच लाज वाटते.

 

पायाला घट्टे असले तर थ्री- फोर्थ, शॉर्ट्स, ॲन्कल लेन्थ पॅण्ट घालतानाही खूपच अवघड होऊन जाते. अशावेळी घोट्यांना पुन्हा फ्रेश करण्यासाठी काय उपाय करावेत, हे नेमके समजत नसल्याने ही समस्या आणखीनच  वाढत जाते. त्यामुळे हे साधे- सोपे आणि घरच्याघरी अगदी सहज करता येतील, असे उपाय करून पहा. यामुळे निश्चितच काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवू लागेल. 

हे काही उपाय करून पहा...

 

१. हरबरा डाळ, उडीद डाळ आणि मसुराची डाळ समसमान प्रमाणात घेऊन त्याचे पीठ करावे. हे पीठ दुधात भिजवावे. त्यामध्ये जेवढे पीठ घेतले असेल, त्याच्या एक चतुर्थांश खडेमीठाची पावडर टाकावी. तळपाय १० मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण घोट्यांवर चोळून चोळून लावावे. ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने धुवून टाकावे. खडेमीठ हे उत्तम क्लिन्जर म्हणून काम करते.

२. ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल एकत्रित करून त्याने दररोज घोट्याची मालिश करावी. 

 

३. लिंबाची फोड जर घोट्यांवर घासली तरी तेथील रापलेली, काळवंडलेली त्वचा निघून जाते आणि तो भाग मऊ पडतो. फक्त हा उपाय करून पाय धुवाल तेव्हा घोट्यावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस करू शकता. 

४. माेहरीचे तेल आणि मीठ एकत्रित करून घोट्याला मसाज करावी. 

५. एरंडेल तेल, ग्लिसरिन आणि बॉडीलोशन एकत्रित करून रोज सकाळी आंघोळ झाल्यावर, घोट्याला लावून नियमित मालिश करावी. हे मिश्रण त्वचेत चांगले जिरले पाहिजे. आठवडाभरातच फरक दिसू लागेल.

 

६. मसूर डाळीचे पीठ आणि साय एकत्रित करून घोट्यांना चोळून लावल्यानेही काळवंडलेली त्वचा उजळू लागते.

७. बटाटा आणि लिंबू यांचा रस एकत्र करून लावल्यानेही काळवंडलेले घोटे पुन्हा उजळू लागतात.  

 

Web Title: feet care tips : home remedies for ankle care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर - Marathi News | Beauty tips: A simple solution for pimples, use toothpaste to get rid of pimples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

एखादा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपल्या चेहऱ्यावर टपोरा फोड दिसू लागतो. अशा वेळी हा उपाय नक्की करून बघा. ...

Easy nail polish hacks : जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेलपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा - Marathi News | Easy nail polish hacks : Old dry nail polish fixing tips article | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जुन्या, सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देताय? थांबा, 'या' ट्रिक्स वापरून नेटपेंट्स पुन्हा पुन्हा वापरा

Easy nail polish hacks : नेलपॉलिश लावताना नेहमी पंखा बंद ठेवा. नेलपेंटच्या उघड्या बॉटलला हवा लागल्यास आतील द्रव पूर्णपणे सुकून जाते. ...

How to Remove Facial Hairs : चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन - Marathi News | How to Remove Unwanted Facial Hairs : Easy home remedies for remove facial hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन

How to Remove Unwanted Facial Hairs : चेहऱ्यावरील केस काढण्याचे हे उपाय खूप सोपे आहेत आणि त्वचेला हानी पोहचवत नाहीत. ...

मऊ मुलायम चमकदार त्वचा हवी? आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त या ५ गोष्टी - Marathi News | Do you want soft glowing skin? Just put these 5 things in the bath water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ मुलायम चमकदार त्वचा हवी? आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त या ५ गोष्टी

आंघोळीला नुसतेच साधे पाणी? मुळीच नकाे, या ५ गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाका आणि जादू बघा.. ...

शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फोड का येतात? ही कसली लक्षणं, कोणता आजार? - Marathi News | Why do acne, pimples appear on different parts of the body? What are these symptoms, what is the disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फोड का येतात? ही कसली लक्षणं, कोणता आजार?

आपल्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स आपल्याला आरोग्याविषयी काही सूचना करत असतात. म्हणूनच तर जाणून घ्या कोणत्या भागातले पिंपल्स काय सांगत आहेत.  ...

कॉम्बिनेशन त्वचेची काळजी कशी घ्यावी | How to take Care of Combination Skin? | Lokmat Sakhi - Marathi News | How to take care of combination skin | How to take Care of Combination Skin? | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :कॉम्बिनेशन त्वचेची काळजी कशी घ्यावी | How to take Care of Combination Skin? | Lokmat Sakhi

कॉम्बिनेशन त्वचेची काळजी कशी घ्यावी तुम्हाला तुमच्या स्किनचा प्रकार माहित आहे का? तुमची स्किन जर combination स्किन असेल तर काय काळजी घ्यावी? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू.. आजच्या विडिओ मध्ये आपण जाणून घेऊयात कि तुमची स्कि ...