Join us

घरीच करा पार्लरसारखं फेशियल, त्वचा इतकी दिसेल सुंदर की सगळे विचारतील बोटॉक्स केलं का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 12:21 IST

Skin care tips : Skin glowing solution : Avoid botox treatment : Home facial that makes skin glow like Botox : महागड्या बोटॉक्सऐवजी आपण काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करुन पाहिले तर त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.

मी कशाला आरशात पाहू ग..! आरशात स्वत:ला पाहिलं की आपला चेहरा सुंदर दिसतो.(Skin care Tips)  पण अनेकदा चेहऱ्यावर असलेल डाग, सुरकुत्या किंवा पिंपल्समुळे त्वचा खराब दिसू लागते. वाढते प्रदूषण, हवामान, सततचे जंक फूड आणि कॅफिन सारख्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतो. (Botox Treatment) अनेकदा पोटाच्या विकारामुळे देखील त्वचेवर पिंपल्स येतात. जास्त ताण घेतल्यामुळे डार्क सर्कल आणि पिग्मेंटेशनचा त्रास सहन करावा लागतो. त्वचा सुंदर, नितळ दिसावी यासाठी आपल्यापैकी अनेकजण महागडी उत्पादने वापरतात. इतकेच नाही पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स घेतात. (Skin Glowing Solution At home) परंतु यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढण्याऐवजी ते अधिक कमी होत जाते. महागड्या बोटॉक्सऐवजी आपण काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करुन पाहिले तर त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. 

व्हायरल व्हिडिओ पाहून स्वयंपाकघरातील ४ गोष्टी चेहऱ्याला चोपडता? १००% पिंपल्स वाढतील-काळे डाग पडतील

1. घरी रसायनांशिवाय खूप चांगली क्लींजर बनवू शकता. यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातील वस्तू लागतील. १ चमचा बेसन, ३ चमचे गुलाबजल आणि या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर २ ते ३ मिनिटे हलक्या हातांनी चेहरा स्वच्छ करणे फायदेशीर ठरु शकते. 

2. चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल, घाण आणि निस्तेजपणा दूर होईल. यामुळे तेलकट त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होते. ओपन पोअर्स कमी होतात. नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी आपल्याला चेहरा स्क्रब करावा लागेल. यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ आणि २ चमचे दूध घेऊन त्याची पेस्ट त्वचेला लावा. नंतर हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे ब्लॅकहेड्स , व्हाइटहेड्स आणि मृत त्वचेच्या पेशी पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. 

3. यानंतर आपण आयसिंग करायला हवं. यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये बर्फ साठवून ठेवावा लागेल. आयसिंगच्या स्टेप्ससाठी आपल्याला मोठ्या भांड्यात पाणी भरुन त्यात बर्फाचे तुकडे घालावे लागतील. त्यात तोंड बुडवून ५ मिनिटे ठेवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारुन त्वचा उजळण्यास मदत होते. 

4. फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला १ चमचा बेसन, १ चमचा चंदन पावडर आणि १ चमचा मुलतानी माती आणि दही लागेल. हे सर्व पदार्थ चांगले मिसळा. चेहऱ्यावर किमान १५ ते २० मिनिटे लावा. सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. हे फेशियल आठवड्यातून एकदा करावं. या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर महागड्या बोटॉक्सची गरज भासणार नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी