>ब्यूटी > फेस सीरम लावल्यानं खरंच त्वचेचं आरोग्य सुधारतं का? कुणी लावलं तर उत्तम, कुणी टाळलेलं बरं..

फेस सीरम लावल्यानं खरंच त्वचेचं आरोग्य सुधारतं का? कुणी लावलं तर उत्तम, कुणी टाळलेलं बरं..

मॉश्चरायझर आणि क्लीनन्जरमुळे त्वचेस जो लाभ होतो त्यापेक्षा जास्त लाभ फेस सीरमच्या वापरानं होतो असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. फेस सीरम हे खराब त्वचा, मुरुम , पुटकुळ्या या त्वचेविषयक समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 07:38 PM2021-05-03T19:38:38+5:302021-05-04T12:58:39+5:30

मॉश्चरायझर आणि क्लीनन्जरमुळे त्वचेस जो लाभ होतो त्यापेक्षा जास्त लाभ फेस सीरमच्या वापरानं होतो असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. फेस सीरम हे खराब त्वचा, मुरुम , पुटकुळ्या या त्वचेविषयक समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरतं.

Is Face Serum Essential for Skin Beauty? | फेस सीरम लावल्यानं खरंच त्वचेचं आरोग्य सुधारतं का? कुणी लावलं तर उत्तम, कुणी टाळलेलं बरं..

फेस सीरम लावल्यानं खरंच त्वचेचं आरोग्य सुधारतं का? कुणी लावलं तर उत्तम, कुणी टाळलेलं बरं..

Next
Highlightsसीरममध्ये क्रीयाशील घटक मुबलक प्रमाणात असल्यानं सीरमच्या वापराचे फायदे त्वचेवर लवकर दिसतात. सीरम हे मॉश्चरायझरपेक्षाही पातळ असल्यानं आणि चिकट नसल्यानं ते त्वचेसाठी अगदी सौम्य असतं.फेस सीरममधील सक्रिय घटकांमुळे मूरुम, पुटकूळ्या असलेल्या संवेदनशील त्वचेसाठी , तेलकट त्वचेसाठी सीरमचा उपयोग फायदेशीर ठरतो.

त्वचेची काळजी घेणं हाच सौंदर्यासाठीचा पहिला नियम. त्वचा चांगली असली की नैसर्गिक सौंदर्य उठून दिसतं. त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमधे फेस सीरमचा सध्या प्रामुख्यानं उल्लेख केला जातोय. इतकंच नाहीतर अनेक सौंदर्यतज्ज्ञ त्वचेच्या सुरक्षेसाठी फेस सीरम वापरण्याचा सल्ला देत आहेत. मॉश्चरायझर आणि क्लीनन्जरमुळे त्वचेस जो लाभ होतो त्यापेक्षा जास्त लाभ फेस सीरमच्या वापरानं होतो असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. फेस सीरम हे खराब त्वचा, मुरुम , पुटकुळ्या या त्वचेविषयक समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरतं.

सीरम वापरण्याचे फायदे काय?

- फेस सीरम हे मॉश्चरायझरपेक्षाही पातळ स्वरुपात असतं. तसेच ते चिकट नसल्यामुळे ते लगेच त्वचेत झिरपतं.

- फेस सीरममधील सक्रिय घटकांमुळे मुरुम, पुटकुळ्या असलेल्या संवेदनशील त्वचेसाठी , तेलकट त्वचेसाठी सीरमचा उपयोग फायदेशीर ठरतो.

- अनेक प्रकारच्या फेस सीरममधे असलेल्या रेटीनॉल या घटकामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

- सीरममधे क, इ जीवनसत्त्वं, फर्क्यूलिक अ‍ॅसिड, ग्रीन ट हे घटक असतात. हे घटक अतीनील किरणांमुळे होणाऱ्या हानीपासून त्वचेच संरक्षण करतं. तसेच वेळेआधीच चेहेऱ्यावर दिसणऱ्या वयाच्या खूणांपासूनही त्वचेचं संरक्षण करतं.

- सीरममध्ये क्रीयाशील घटक मुबलक प्रमाणात असल्यानं सीरमच्या वापराचे फायदे त्वचेवर लवकर दिसतात.

- सीरम हे मॉश्चरायझरपेक्षाही पातळ असल्यानं आणि चिकट नसल्यानं ते त्वचेसाठी अगदी सौम्य असतं.

सीरमचे प्रकार

सीरमचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या त्वचेसाठी काय हवं किंवा आपल्याला त्वचेची कोणती समस्या आहे याचा विचार करुन सीरमचा उपयोग करायचा असतो.

- अ‍ॅण्टि एजिंग सीरम- हे सीरम त्वचेतील कोलॅजन निर्मितीला उत्तेजन देतं.

- स्कीन ब्राइटनिंग सीरम- या सीरममधे अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. तसेच क जीवनसत्त्वं, ग्लायकोलिक अ‍ॅसिड, फर्क्यूलिक अ‍ॅसिड, मश्चरुम्सचा अर्क, लॅक्टीक अ‍ॅसिड हे घटक असल्यानं त्वचेचा पोत सूधारतो.

- हायड्रेटिंग सीरम- लहान मुलांच्या त्वचेमधे ह्यालूरॉनिक अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांची त्वचा जास्त आर्द्र असते. पण वय जसं वाढतं तसं हे अ‍ॅसिडचं प्रमाण आणि कोलॅजन निर्मितीवर परिणाम होतो. पण या सीरमच्या वापरानं त्वचेखालील पाण्याचा थर सुरक्षित राहातो. हे सीरम त्वचा ओलसर ठेवते त्यामुळे अकाली सुरकुत्यांचा धोका टळतो. या प्रकारच्या सीरममधे बी ५ हे जीवनसत्त्वं असल्यानं त्वचा ओलसर आणि मऊ ठेवण्यस मदत होते.
 - फ्री रॅडिकल फायटिंग सीरम- या सीरममधील क, अ आणि इ जीवनसत्त्वांमुळे अतीनील किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळलं जातं.
- अ‍ॅक्ने सेन्सिटिव्ह स्कीन सीरम- या सीरममधे सालिसायलिक अ‍ॅसिड, बी३ जीवनासत्त्व यांचा समावेश असल्यानं संवेदनशील त्वचेसाठी या सीरमचा उपयोग केला जातो. मुरुम पुटकुळ्यांमुळे त्वचेचा होणारा दाह या सीरमच्या वापरानं कमी होतो.
- स्कीन टेक्श्चर सीरम- या सीरममधील ग्लायकोलिक अ‍ॅसिड या घटकामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवरील डाग, मृत पेशी जाऊन त्वचा मऊ आणि चमकदार होते.
 
सीरम कसं वापरतात?

चेहेरा धुतल्यानंतर किंवा क्लीन्जर वापरुन झाल्यावर चेहेरा कोरडा करुन आधी सीरम लावावं. आणि मग त्यावर मॉश्चरायझर, सनस्क्रीन लावून आवश्यक मेकअप करावा. दिवसातून एकदा किंवा दोनदा सीरमचा वापर करावा. पण आपल्याला काय हवं आहे यावर सीरमचा वापर कधी आणि किती वेळा करावा हे ठरतं. अ‍ॅण्टी पिग्मेण्टेशन आणि अ‍ँण्टि ऑक्सिडण्ट सीरम हे सकाळी वापरावं. यामूळे पर्यावरणीय कारणांमुळे होणाऱ्या हानीपासून त्वचेचं नुकसान होतं. अ‍ॅण्टि एजिंग सीरमचा उपयोग हा रात्री करावा. त्वचेची हानी भरुन काढण्याचं काम रात्री चांगलं होतं. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरमचा उपयोग दिवसातून दोन वेळा करावा.
 

Web Title: Is Face Serum Essential for Skin Beauty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.