वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याच्या खुणा चेहऱ्यावर लवकर दिसायला लागल्या की अनेकींना काळजी वाटू लागते. विशेषतः त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या, निस्तेजपणा आणि सैलपणा यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी झाल्यासारखं वाटतं. प्रत्येकीला आपली त्वचा कायमच कोणत्याही वयात नितळ आणि सुंदर असावी असं वाटतं. मात्र, वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागल्या की आपल्याला नको, नको वाटत...वाढत्या वयानुसार त्वचेत होणारे बदल नैसर्गिक असले, तरी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अनेकदा आपला आत्मविश्वास कमी करतात, यामुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसतो(face mask for wrinkles and fine lines).
त्वचेवर दिसणाऱ्या या एजिंगच्या खुणा आणि सुरकुत्या घालवण्यासाठी स्वयंपाकघरात सहज मिळणारे नैसर्गिक पदार्थच अतिशय फायदेशीर ठरतात...नेहमीच्या वापरातील काही पदार्थांच्याच मदतीने त्वचेला पोषण देऊन सुरकुत्या (homemade anti ageing face pack) कमी करता येतात आणि त्वचेची हरवलेली नैसर्गिक चमक पुन्हा मिळवता येते. त्वचेवरील सुरकुत्यांमुळे तुमचं अचानकपणे जास्त दिसणारं वय लपवण्यासाठीची चिंता सोडा...आता घरबसल्या मिळवा तरुण आणि तजेलदार (anti ageing face mask) त्वचा फक्त यासाठी घरगुती उपाय म्हणून नेमकं करायचं काय ते पाहूयात...
त्वचेवरील सुरकुत्या घालवण्याचा देसी उपाय काय ?
वाढत्या वयानुसार त्वचेवर वारंवार दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा आणि सुरकुत्या घालवण्यासाठी आपल्याला १ कप मखाणे पावडर, १ टेबलस्पून एलोवेरा जेल, १ टेबलस्पून गुलाब पाणी इतक्या तीनच पदार्थांची गरज लागणार आहे.
नेमका उपाय काय ?
सर्वातआधी मखाणे व्यवस्थित बारीक करून त्याची पावडर तयार करून घ्या. आता एका बाऊलमध्ये १ चमचा एलोवेरा जेल आणि २ चमचे गुलाब पाणी घ्या. यामध्ये मखाण्याची पावडर मिसळून तिन्ही गोष्टींचे एकजीव मिश्रण तयार करा. तुमचा घरगुती फेसपॅक आता वापरासाठी तयार आहे.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
कसा वापरायचा हा फेसपॅक...
हा अँटी - एजिंग फेसपॅक लावण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. तयार केलेली पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर किंवा ज्या भागात जास्त एजिंगच्या खुणा, सुरकुत्या आहेत त्या भागात व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हा फेसपॅक तसाच सुकू द्या. वेळ पूर्ण झाल्यावर चेहरा कोमट किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पहिल्याच वापरापासून तुम्हाला तुमच्या त्वचेत कमालीचा बदल जाणवेल.
नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट...
हा घरगुती उपाय करण्याचे फायदे...
१. मखाणे :- मखाण्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड असतात. हे घटक त्वचेतील कोलाजन वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि सुरकुत्या कमी होतात. मखाण्यामुळे त्वचेला नैसर्गिक पोषण मिळून ती अधिक घट्ट आणि तरुण दिसते.
२. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' मुळे त्वचेचा पोत सुधारतो. हे जेल त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान भरून काढते, ज्यामुळे अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात.
३. गुलाब पाणी :- गुलाब पाणी हे एक उत्तम नॅचरल टोनर आहे. ते त्वचेचा 'पीएच' (pH) स्तर संतुलित राखते आणि चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते आणि त्वचेवरील थकवा दूर होऊन चेहरा टवटवीत दिसू लागतो.
