Hairfall Causes : केस गळणे ही अलिकडे फारच गंभीर आणि मोठी समस्या झाली आहे. तसे तर केस गळणे ही एक नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे रोज साधारणपणे 50–100 केस गळणे नैसर्गिक मानले जाते, पण जेव्हा केस अचानक जास्त प्रमाणात गळू लागतात किंवा गुच्छांच्या स्वरूपात गळतात, तेव्हा ते दुर्लक्ष करण्यासारखं नसतं. अनेकदा हे फक्त ताण, हवामान किंवा काळजीची कमतरता नसून शरीरातील एखाद्या समस्येचं लक्षण असू शकतं. अशात केस अचानक जास्त तुटू लागण्याची किंवा गळण्याची कारणं जाणून घेऊयात.
केस गळण्यामागची कारणे
थायरॉइडची समस्या
थायरॉइड ही आजकाल खूप सामान्य झाली आहे. मानेच्या समोर असलेली ही ग्रंथी शरीराचं मेटाबॉलिझम नियंत्रित करते. हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड दोन्ही स्थितीत केस कमजोर होऊन लवकर गळू लागतात.
एलोपेशिया एरियाटा
एलोपेशिया एरियाटामध्ये शरीराची इम्युन सिस्टिम केसांच्या मुळांवरच हल्ला करते. यामुळे डोक्यावर गोल-गोल टक्कल पडल्यासारखे पॅचेस दिसतात आणि केस अचानक गळतात.
अॅनिमिया
अॅनिमिया म्हणजे शरीरात आयर्नची कमतरता. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसं ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही, त्यामुळे केस लवकर गळतात. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसते.
लक्षात ठेवण्यासारखं
केस गळणे हे कधी-कधी मोठ्या आजाराचे संकेत असू शकते. त्यामुळे सतत केस गळत असतील, गाठीत केस निघत असतील, टक्कल पडल्यासारखे दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.
Web Summary : Excessive hair fall can indicate underlying health problems like thyroid issues, alopecia areata, or anemia. Don't ignore sudden or clumpy hair loss; consult a doctor to rule out serious conditions and get timely treatment.
Web Summary : अत्यधिक बाल झड़ना थायरॉइड, एलोपेसिया एरीटा या एनीमिया जैसी स्वास्थ्य समस्याओं का संकेत हो सकता है। अचानक या गुच्छों में बाल झड़ने को अनदेखा न करें; गंभीर स्थितियों से बचने के लिए डॉक्टर से सलाह लें।