Join us

वय कमी तरी डोकं पांढऱ्या केसांनी भरलं? हॉमिओपेथी डॉक्टरांनी सांगितले २ उपाय, काळे होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 18:49 IST

Effective Remedy To Color White Hair : होमिओपेथी डॉक्टर राजू राम गोयल यांनी सांगितलेले काही उपाय करून तुम्ही अवेळी पांढरे होणारे केस १०० टक्के काळे करू  शकता.

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण पांढऱ्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहे आजकाल फक्त वयस्कर लोकांचेच केस पांढरे होत नाहीत तर शाळा, कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुलींचेही केस पांढरे होत आहेत. याचं कारण असं की केसांना पुरेपूर पोषण मिळत नाही. (Grey Hairs Solution) होमिओपेथी डॉक्टर राजू राम गोयल यांनी सांगितलेले काही उपाय करून तुम्ही अवेळी पांढरे होणारे केस १०० टक्के काळे करू  शकता.

केस काळे करण्यासाठी २ उपाय अत्यंत परिणामकारक आणि प्रभावी आहेत. हे उपाय केल्यानं केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल. डॉक्टर सांगतात कोणतीच गोष्ट इंस्टंट होत नाही. (Effective Remedy To Color White Hair Black Suggested By Homeopathy Doctor Raju Ram Goyal) 

डॉक्टर राजू सांगतात की तुम्ही हे २ उपाय  कराल तेव्हा थोडं धीर धरायला हवा कारण इंस्टट काहीच होत नाही जर तुम्ही केमिकल्सचा वापर केला तर केस २ मिनिटांत काळे होतील सुद्धा. पण १० ते १५ दिवसांनंतर केस पुन्हा पांढरे होऊ लागतात. केस काळे करण्यासाठी होमिओपेथी डॉक्टरांनी सांगितलेले काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. 

आवळा केसांवर असा वापरा

सायन्स डायरेक्ट. कॉमच्या रिपोर्टनुसारआवळ्याचा अर्क अकाली केस गळणं, केस पिकणं या गोष्टी थांबवू शकतो. आवळा एक जडीबूटी आहे ज्यामुळे केसांशी संबंधित समस्याशी लढण्यास मदत होते. तुम्ही रोज केसांवर आवळ्याचा रस लावू शकता आपल्या डाएटमध्ये ज्यूस किंवा मोरंब्बा यांचा समावेश करा (Ref). ज्यामुळे केस हेल्दी आणि काळे राहण्यास मदत होते. जर तुम्हाला नेहमीसाठी केसांना काळे ठेवायचे असेल तर आवळा नक्की खा. 

त्रिफळाचे उपयोग

डॉक्टर गोयल त्रिफला खाण्याचे फायदे सांगतात. त्रिफळा तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर  ठरते. शरीर डिटॉक्स होते आणि मेलेनिसुद्धा मदत करते ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यात हरड आणि बडेहा असते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. म्हणूनच तुम्ही आपल्या केसांवर त्रिफळाचा वापर करू शकता. याच्या वापरानं केस पांढरे होत नाहीत. 

केसांवर त्रिफळाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. जसं की दही मिसळून किंवा मेथीच्या दाण्यांची पेस्ट मिसळून हेअर मास्क लावा. याव्यतिरिक्त तुम्ही पाण्यात त्रिफळा मिसळून पेस्ट तयार करू शकताा. आणि १० मिनिटं मसाज केल्यानंतर हेअर वॉश करा. यामुळे स्काल्प हेल्दी राहण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी