Join us

सणावाराला चेहऱ्यावर पिंपल्स नको तर करा १ सोपा उपाय, चेहरा दिसेल नितळ, सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2023 12:22 IST

Easy Home made Pimple remover face pack : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तयार होणारा सोपा फेस पॅक

सणवार म्हटलं की आपण सुंदर दिसावं असं आपल्याला साहजिकच वाटतं. काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना आपल्या चेहऱ्यावर खूप डाग असले, त्वचा सुरकुतलेली असली की आपल्याला काय करावं कळत नाही. पिंपल्स ही तर तरुणांना भेडसावणारी अतिशय सामान्य समस्या. पोट साफ नसणे, हार्मोन्सच्या समस्या, जंकफूडचे सेवन, अपुरी झोप, सौंदर्यप्रसाधनांचा वापर अशा विविध कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स आले की चेहरा अतिशय खराब दिसायला लागतो (Easy Home made Pimple remover face pack). 

कित्येकदा पिंपल्सचे प्रमाण इतके जास्त असते की मेकअप करुनही चेहऱ्यावरचे पिंपल्स काही केल्या झाकले जात नाहीत. पण मेकअपने हे पिंपल्स झाकण्यापेक्षा ते येऊच नयेत म्हणून आहार, आरोग्य, त्वचा यांची काळजी घेणे केव्हाही जास्त चांगले. पिंपल्स जावेत यासाठी भरपूर उपाय असतात, आज असाच घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा फेसपॅक तयार होत असून तो कसा तयार करायचा आणि चेहऱ्याला कसा लावायचा पाहूया...

(Image : Google )

१. एका बाऊलमध्ये १ चमचा बेसनाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये १ चमचा दही घालायचे आणि हे दोन्ही चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

२. जास्त घट्ट वाटले तर यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करायची. 

३. चेहरा स्वच्छ धुवून आणि कोरडा करुन त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर २ लेअरमध्ये एकसारखी लावायची. 

४. त्यानंतर साधारण २० मिनीटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवायची आणि मग चेहऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा. 

५. साधारण १ आठवडा हा उपाय करत राहिल्यास चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यास निश्चितच मदत होते. 

६. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि कमीत कमी पदार्थांपासून अगदी झटपट हा पॅक तयार होत असल्याने पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी हा पॅक नक्की ट्राय करुन पाहा.

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी