Join us

उन्हाळ्यात ओठ कोरडे-लिपस्टिक टिकत नाही? ४ सोप्या टिप्स- दिवसभर लिपस्टिक खराब व्हायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 15:47 IST

Dry lips in summer: How to prevent dry lips in summer: Best lip care tips for summer: How to make lipstick last all day: Long-lasting lipstick tips:Lipstick that stays on dry lips: Best lipstick for summer : आपली लिपस्टिक अधिक काळ टिकेल आणि ओठ ही सुंदर दिसतील.

ऑफिसला, पार्टीसाठी किंवा लग्न समारंभात त्वचेसोबत ओठ अधिक सुंदर दिसावे यासाठी आपण लिपस्टिक लावतो.(Dry lips in summer) अनेक मुलींना मेकअप करायला आवडते. परंतु, मेकअप केला नाही तरी ओठांवर लिपस्टिक लावली जाते. ओठ जर कोरडे असतील तर व्यवस्थित रित्या सेट होत नाही. यात ओठांची त्वचा निघते. (How to prevent dry lips in summer)ज्यामुळे ओठांची लिपस्टिक देखील निघून जाते. (Best lip care tips for summer)कोरडे ओठ झाल्यानंतर अनेकांना त्यावर जीभ फिरवण्याची किंवा दाताने कुरतडण्याची सवय असते. (How to make lipstick last all day)ज्यामुळे लिपस्टिक जास्त वेळ राहात नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा लिपस्टिक लावावी लागते. हा त्रास आपल्याला वारंवार सहन करावा लागत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आपली लिपस्टिक अधिक काळ टिकेल आणि ओठ ही सुंदर दिसतील. 

महागड्या पार्लरचा खर्च नको! रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'गोल्डन ग्लो क्रीम', डार्क सर्कल- पिग्मेंटेशन होतील कमी

1. ओठांना एक्सफोलिएट करा 

आपले ओठ व्यवस्थित एक्सफोलिएट केले तर त्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. ज्यामुळे ओठ चमकतात तसेच मऊ देखील होतील. त्यामुळे लिपस्टिक क्रिस्टी दिसणार नाही. ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी साखर आणि कॉफीचा स्क्रब लावायला हवा. 

2. मॉइश्चरायझ करा 

ओठ चांगले मॉइश्चरायझ केलेले असतील तर लिपस्टिक बराच काळ टिकते. यासाठी ओठांवर लिप बाम लावा. तसेच नारळाचे तेल, दुधाची साय किंवा तूप लावल्याने ओठ हायड्रेट राहतात. ओठांची त्वचा कोरडी पडत नाही. 

साडीच्या रंगानुसार निवडा लिपस्टिकच्या शेड्स, सणासुदीत- लग्न समारंभात दिसाल उठून, ओठही दिसतील सुंदर

3. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनर 

ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनर लावा. यामुळे ओठांच्या बाहेरील बाजूला बेस तयार होतो. हे ओठांचा आकार छान पण दाखवते. हे लायनर संपूर्ण ओठांना लावण्याचा प्रयत्न करा. लायनरच्या पातळ थरावर लिपस्टिक लावली तर जास्त काळ टिकते. 

4. लिपस्टिकचा थर जास्त नको 

लिपस्टिक निघून जाते यासाठी अनेकजण जास्त प्रमाणात ब्रश फिरवतात. यामुळे ओठ जड होतात ज्यामुळे ओठ सुजल्यासारखे वाटू शकतात. अशावेळी लिपस्टिकचा पातळ थर लावला की, लिपस्टिक सुंदर दिसते. 

5. टिशू पेपर 

ओठ सुंदर दिसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करता येईल. लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर टिशू पेपर ठेवा. हलकेच टॅप करा. ज्यामुळे जास्त लागलेली लिपस्टिक निघून जाण्यास मदत होईल. लिपस्टिकचा थर बराच काळ ओठांवर राहिल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी