हल्ली चेहऱ्यासोबत केसांचे आरोग्य देखील जपले जात आहे. वाढते प्रदूषण, चुकीचे खाणेपिणे, बदलेली जीवनशैली, सतत कॅफिनचे सेवन यांचा आपल्या आरोग्यासह केसांवर देखील परिणाम होतो.(Hair care Tips) ज्यामुळे केसगळती, केसांना फाटे फुटणे, केस विरळ होणे, सतत केस कोरडे पडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (how to make shampoo bar at home)
केसांना सॉफ्ट आणि शायनी बनवण्यासाठी आपण अनेक केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो.(herbal shampoo for hair fall and dandruff) तसेच केसचे सिल्क करण्यासाठी महागडे उत्पादने आणि पार्लरचा खर्च करतो. आयनिंग आणि स्ट्रेनिंगमुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिक वाढतात. (dry hair natural treatment at home)
गुडघ्यापर्यंत वाढतील केस, ७ प्रकारचे तेल केसांना लावा-एक लावलं तरी केस होतील काळे लांबसडक!
केसांसाठी केमिकलयुक्त गोष्टी वापरण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केल्यास केसगळती रोखता येते.(ayurvedic shampoo bar for hair repair) आयुर्वेदिक वनस्पती केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच यामुळे आपल्या टाळूची सुधारणा होते. केसांसाठी अनेक आयुर्वेदिक पदार्थ फायदेशीर आहेत. ज्यामुळे केसांची वाढ तर होतेच पण केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होते. तसेच केसातील कोंडा देखील कमी होतो. आपल्याला वारंवार केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर घरीच बनवा आयुर्वेदिक पदार्थ वापरुन नॅचरल शॅम्पू, कमी खर्चात तयार होईल. केसांच्या अनेक समस्यांपासून होईल सुटका.
नॅचरल शॅम्पू तयार करण्यासाठी
ग्लिसरीन सोप बेस - अर्धा किलो
शिकाकाई पावडर - १ चमचा
रिठा पावडर - १ चमचा
आवळा पावडर - १ चमचा
भृंगराज पावडर - १ चमचा
जास्वंदीच्या फुलांचा पावडर - १ चमचा
एरंडीचे तेल - १/२ चमचा
बदामाचे तेल - १/२ चमचा
व्हिटॅमिन ई ऑइल - १/२ चमचा
गुलाब पाणी - २ चमचे
कोरफड जेल - १ चमचा
शॅम्पू कसा बनवाल?
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये सगळे पावडर घ्या. त्यामध्ये एरंडीचे तेल, कोरफड जेल, बदामाचे तेल, व्हिटॅमिन ई ऑइल आणि गुलाब पाणी घालून चांगले मिक्स करा. आता ग्लिसरीन बेस साबणाचे तुकडे करा. गरम पाणी ठेवून त्यात काचेच्या बाऊलमध्ये साबण वितळवून घ्या. आता त्यात पावडरची तयार केलेली पेस्ट घालून मिसळवून घ्या. ही पेस्ट जास्त पातळ आणि जास्त घट्ट ही नको. त्यानंतर सोप बेस मोल्डमध्ये घाला. सेट झाल्यानंतर तयार होईल होममेड नॅचरल शॅम्पू.