Home Remedies to Stop Hair fall : केसगळतीच्या समस्येने आजकाल केवळ महिलाच काय तर पुरूषही वैतागलेले असतात. सतत केसगळती होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. यात केसांची योग्य काळजी न घेणे, केसांवर केमिकल्सचा वापर करणे, पोषणाची कमतरता, कोंडा, प्रदूषण, धूळ इत्यादींचा समावेश करता येईल. केस विंचरताना थोडेफार गळणं कॉमन असतं, पण जर केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर चिंतेची बाब आहे. केस नेहमीच गळत असतील तर कधी विरळ दिसू लागतील काहीच सांगता येत नाही. अशात योगगुरू डॉ. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) यांनी सांगितलेले नॅचरल उपाय ट्राय करू शकता.
केसगळती थांबवण्याचे घरगुती उपाय
योगगुरू डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात की, केस गळण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे की, अनहेल्दी आहार, पोषक तत्वांची कमतरता, औषधं, एखादा आजार, स्ट्रेस, प्रदूषण आणि जेनेटिक्स. पुरूषांमध्ये केसगळतीचं कारण त्यांनी सतत टोपी घालून राहणं किंवा हेल्मेट जास्त वापरणं असू शकतं. अशात काही घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. महिला आणि पुरूष दोघांनाही याचे फायदे मिळू शकतात.
अॅवोकाडो आणि केळ्याचा हेअर मास्क
अॅवोकडो आणि केळ्याचा हेअर मास्क डोक्यावर लावून डोक्याच्या त्वचेला व्हिटामिन ए, ई, बायोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात. ज्यामुळे केसांना हायड्रेशन मिळतं आणि केस रिपेअर होतात.
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका मध्यम आकाराचं अॅवोकाडो घ्या आणि त्यात एक केळं टाकून मिक्स करा. नंतर यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाका. तुमचा हेअर मास्क तयार आहे.
हा हेअर मास्क डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना चांगल्या पद्धतीनं लावा. अर्धा तास हेअर मास्क तसाच लावून ठेवा आणि त्यानंतर एखाद्या माइल्ड शाम्पूनं केस धुवा. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. ज्या लोकांचे केस ड्राय आणि रखरखीत आहे ते लोक हा हेअर मास्क आठवड्यातून एक वेळा लावू शकतात.
आवळा आणि शिकेकाई तेल
आवळा आणि शिकेकाई तेलही केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर उपाय असल्याचं डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी सांगितलं. आवळा आणि शिकेकाई तेल केसांवर लावल्यानं केसांची मूळं मजबूत होतात, केस जाड होतात आणि केसांची वाढही होते.
हे तेल बनवण्यासाठी एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा शिकेकाई 2 चमचे खोबऱ्याच्या तेलात टाकून उकडा. तेल चांगलं गरम झाल्यावर गाळून घ्या. हे आवळा शिकेकाई तेल डोक्यावर हलकं कोमटचं लावावं. हे तेल डोक्यावर एक तासांसाठी लावून ठेवा किंवा रात्रभरही डोक्यावर लावून ठेवू शकता. शाम्पू धुवून केस चांगले साफ करा. या तेलाचा प्रभाव अधिक दिसण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा हे तेल डोक्यावर लावू शकता.