Join us
Daily Top 2Weekly Top 5

डबल चिन फक्त फॅट्समुळे नाही तर 'या' कारणांमुळेही वाढते, पाहा तुमचं नेमकं काय होतंय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2026 16:33 IST

Double chin increases not only due to fats but also due to 'these' reasons, see what to do : डबल चिन कमी करण्यासाठी टिप्स.

आरशात पाहताना हनुवटीखाली दिसणारी डबल चिन अनेकांना त्रासदायक वाटते. वजन वाढलं की ती दिसतेच, पण काही वेळा वजन कमी असतानाही ही समस्या दिसू शकते. (Double chin increases not only due to fats but also due to 'these' reasons, see what to do )त्यामुळे ती कमी करण्यासाठी फार अवघड उपायांची गरज नसते, थोड्या सवयी बदलल्या तरी फरक दिसू शकतो.

सगळ्यात आधी लक्ष द्यायचं ते आपल्या दैनंदिन हालचालींवर. आजकाल सतत मोबाइल किंवा लॅपटॉपकडे खाली मान घालून पाहण्याची सवय लागली आहे. यामुळे मान आणि हनुवटीच्या आसपास चरबी साठण्यास मदत होते. त्यामुळे शक्य तितकं मोबाइल डोळ्यांच्या लेव्हलला धरून वापरणं आणि बसताना पोश्चर सरळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

तसंच, काही सोपे फेस एक्सरसाइज नियमित केल्यासही चांगला फरक पडतो. उदाहरणार्थ, वरती छताकडे पाहून ओठ पुढे काढण्याचा (pout) व्यायाम, किंवा ओ आणि ई अशी अक्षरे उच्चारताना चेहऱ्याचे स्नायू ताणण्याचा सराव हे सगळं हनुवटीभोवतीचे स्नायू टोन करण्यात मदत करतात. दिवसातून १० ते १५ मिनिटे हे केलं तरी परिणाम दिसू लागतात. पाणी पिण्याची सवयही खूप महत्त्वाची आहे. शरीरात पाणी कमी असेल तर सूज येऊ शकते आणि त्यामुळे डबल चिन अधिक ठळक दिसते. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.

आहाराकडेही लक्ष द्यायला हवं. जास्त तेलकट, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो. त्यामुळे हलका, संतुलित आहार, भाज्या, फळं, प्रोटीनयुक्त पदार्थ यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते आणि डबल चिन कमी होण्यास मदत होते.

याशिवाय, हलका मसाज करणंही उपयोगी ठरू शकतं. बदाम तेल किंवा नारळ तेलाने हनुवटीखालील भागावर वरच्या दिशेने मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा टाईट होण्यास मदत होते. झोपेची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. कमी झोप किंवा चुकीच्या उशेमुळे चेहऱ्यावर सूज येते. त्यामुळे पुरेशी आणि व्यवस्थित झोप घेतल्यास चेहरा अधिक टवटवीत दिसतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Double chin: Causes beyond fat and simple solutions explained.

Web Summary : Double chin isn't always about fat. Posture, screen time, diet, hydration, sleep, and simple facial exercises can help reduce it. A light massage improves blood flow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीव्यायाम