lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....

केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....

Dos and Don'ts of Oiling Your Hair : जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि रात्रभर केसांना लावणं टाळा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 04:19 PM2023-09-10T16:19:26+5:302023-09-10T19:14:30+5:30

Dos and Don'ts of Oiling Your Hair : जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि रात्रभर केसांना लावणं टाळा.

Dos and Don'ts of Oiling Your Hair : How To Oil Your Hair The Right Way | केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....

केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....

रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं यात विशेष असं काही नाही . केसांच्या मुळापर्यंत तेल पोहोचावं यासाठी अनेकजण हा उपाय करतात. खासकरून महिलांना रात्रीच्यावेळी केसांना तेल लावण्याची सवय  असते. सकाळी उठल्यानंतर त्या केस धुतात. (How To Oil Your Hair The Right Way)

असं केल्याने त्वचेचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. केसांना तेल लावताना कोणत्या चूक टाळाव्यात ते समजून घेऊया. यामुळे फक्त केसांवरच चुकीचा परिणाम होत नाही तर चेहराही खराब होऊ शकतो. रात्रभर केसांना तेल का लावू नये, समजून घ्या. (Right Way to apply oil on hairs)

१) रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्यामुळे त्वचेची छिद्र बंद होऊ शकतात. परिणाम क्लोग्ड पोर्सची समस्या उद्भवते. केसांमध्ये गरजेपेक्षा जास्त घाण जमा होते. जर तुम्ही नखांनी स्काल्पवर खाजवले तर नखांमध्ये घाण जमा झालेली दिसून येईल. क्लोग्ड पोर्स आणि ब्लिड अप जमा होण्याचा हा परिणाम आहे.

२) जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि रात्रभर केसांना तेल लावणं टाळा. (Overnight Hair Oiling) कारण यामुळे केसांमध्ये कोंड्याबरोबरच घाणही जमा होते. यामुळे केसही मळतात. पेक्षा तुम्ही हायड्रेटींग मास्क लावायला हवा.

३) महिलांचे केस खूप तेलकट होता. तेलकट केसांवर रात्रभर तेल लावून ठेवल्याने धूळ, घाणं माती जास्त प्रमाणात केसांवर चिकटते. अनेकदा ही घाण धुतल्यानंतरही निघत  नाही.

४) जर तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर रात्री तेल लावण्याऐवजजी सकाळी केस धुण्याच्या अर्धा ते एक तास आधी तेल लावा. रात्रभर तेल लावून ठेवल्यास  केसांवर खाजही येऊ  शकते. 

५) गरजेपेक्षा जास्त तेल लावल्याने चेहऱ्यावर एक्ने, पिंपल्सची समस्या उद्भवते. ऑव्हरनाईट ऑयलिंगमुळे तेल उशीला लागते. आणि चेहऱ्यालाही लागतं. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाने केसांच्या मुळांची मसाज करा. त्यानंतर १ ते २ दोन तासांनी तुम्ही केस धुवू शकता. केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट पाण्याने तुम्ही केस धुवू शकता. 

Web Title: Dos and Don'ts of Oiling Your Hair : How To Oil Your Hair The Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.