आपल्याकडे सौंदर्याच्या व्याख्येमध्ये रंगाचाही समावेश केला जातो. खास म्हणजे मुलींसाठी. मुलगी अगदी तांदूळवर्णीयच असायला हवी, तरच ती सुंदर.(don't use face whitning crems its just a scam) रंगावरुन माणसांना हिणवण्याचे प्रकार जगभरात घडतात. माणसाच्या रंगावरून त्याचे कतृत्व ठरवता येऊ शकते का? चित्रपटांमध्ये अभिनेत्री कायम लख्ख गोरीच असते. तरच तो सिनेमा चालतो. काळा रंग तर सोडाच साधी गहूवर्णीय असलेलीही मुलगी चालत नाही. (don't use face whitning crems its just a scam)म्हणून अनेक मुली ब्यूटी ट्रिटमेंट घेऊन रंग गोरा करून घेतात. ज्यांना परवडत नाही अशा मुली मग स्वस्तातल्या क्रिम वगैरे वापरून प्रयोग करतात.
पिचट्री क्लिनिकच्या फाऊंडर स्मिता भोईर पाटील सांगतात की, ज्या रंगाने तुम्ही जन्माला आलात तोच तुमच्या त्वचेचा खरा रंग. तो काहीही करून बदलता येत नाही. (don't use face whitning crems its just a scam)सूर्यामुळे झालेले टॅनिंग, प्रदूषणामुळे काळवंडलेला चेहरा काही उपाय करून पूर्ववत करता येतो. पण चेहर्याचा मुळ रंग बदलता येत नाही. अशा क्रिम्स लावल्याने चेहर्याचे नुकसान होऊ शकते. अशा फसवणुकींना बळी पडू नका. चेहरा स्वच्छ दिसावा असे वाटणे योग्यच आहे. पण गोराच दिसायला हवा याला काहीच अर्थ नाही.
प्रत्येक रंगाची मुलगी ही सुंदरच असते. आजकाल व्हायटनिंग क्रिम्सचा स्कॅम जोरदार सुरू आहे. मुली त्याला बळी पडतात. अशा क्रिम डॉक्टरांच्या मंजूरीशिवाय विकल्या जातात. त्यात फक्त रसायने असतात. त्यांचे अनेक दुष्परिणाम असतात. चेहर्यावर पुरळ उठते. तसेच चेहरा करपतो ही. तुम्हीही अशा कोणत्याही वस्तू वापरू नका. यांहून भयंकर दुष्परिणामही आहेत.
चेहर्यावर होणारे टॅनिंग चांगल्या मेडिकल प्रॉडक्ट्सचा वापर करून घालवता येते. तसेच काही घरगुती उपाय करूनही घालवता येते. जसे की, हळदीचा फेस पॅक लावता येतो. बेसन लावता येते. इतरही उपाय आहेत. लक्षात ठेवा सुंदरतेचा आणि रंगाचा काहीच संबंध नसतो. त्यामुळे अति विचार करून चुकीची पावले उचलू नका. आणखी सुंदर दिसण्याच्या नादात असलेले सौंदर्य गमावून बसाल.