आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटतं असते. त्यासाठी आपण चेहऱ्याची अतिशय नीटपणे काळजी घेतो.(Skin Care After Waxing) सुंदर दिसावे यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतो. तसेच चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेकदा पार्लरमध्ये देखील जातो. हे केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केले जाते. त्यामुळे त्वचा जळजळते. ( Upper Lip Waxing Redness Relief)आपल्याला सुद्धा अप्पर लिप्सचे वॅक्सिंग केल्यानंतर जळजळ होते. (How to Soothe Skin After Waxing) आग किंवा रॅशेस येतात किंवा त्वचा लालसर पडत असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. यामुळे त्वचेच्या त्या ठिकाणी मुरुमे देखील येतात.(How to Avoid Redness After Waxing) वॅक्स केल्यामुळे अनेकदा त्वचेचा रंग देखील बदलतो. आपण देखील या समस्येला सामोरे जात असू तर हे सोपे घरगुती उपाय करुन पाहा.
काळपट ओठ होतील गुलाबी! ४ घरगुती उपाय, ओठ कायम दिसतील सुंदर आणि राहतील मऊ
1. गुलाब पाणी
आपली त्वचा वॅक्सिंग केल्यानंतर लाल होत असेल तर त्या ठिकाणी गुलाब पाण्याचा वापर करा. यासाठी गुलाबपाणी एका स्प्रे बाटलीत घ्या. वॅक्सिंग केल्यानंतर जळजळणाऱ्या ठिकाणी लावून चांगले मालिश करा. हे लावल्याने त्वचा थंड होईल. तसेच पुरळ येण्याची समस्या कमी होईल.
2. नारळाचे तेल
वॅक्सिंग केल्यानंतर अनेकदा अप्पर लिप्सचा भाग लालसर पडतो. सतत खाज येऊन आग होते. अशावेळी नारळाचे तेल लावायला हवे. यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा हळूहळू कमी होईल. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग राहाणार नाहीत.त्वचा देखील निरोगी राहाण्यास मदत होईल.
3. मॉइश्चरायझर
आपल्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा. ज्यावेळी आपण वॅक्स करतो तेव्हा त्वचा कोरडी आणि लालसर होते. अशावेळी त्वचा मॉइश्चर असणे फार महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेवरील लालसरपणा कमी होईल, त्वचेची जळजळही कमी होण्यास मदत होईल.