Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कुठेही जाताना पोहचण्याआधीच केस होतात फ्रिझी? ५ मिनिटांची तयारी आणि दिवसभर केस राहतील सुंदर आणि व्यवस्थित

कुठेही जाताना पोहचण्याआधीच केस होतात फ्रिझी? ५ मिनिटांची तयारी आणि दिवसभर केस राहतील सुंदर आणि व्यवस्थित

Does your hair get frizzy? 5 minutes of preparation and your hair will stay beautiful and well-groomed all day long : केस स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी करा हे उपाय. पाहा सोप्या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 17:02 IST2025-11-27T17:00:49+5:302025-11-27T17:02:02+5:30

Does your hair get frizzy? 5 minutes of preparation and your hair will stay beautiful and well-groomed all day long : केस स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी करा हे उपाय. पाहा सोप्या टिप्स.

Does your hair get frizzy? 5 minutes of preparation and your hair will stay beautiful and well-groomed all day long. | कुठेही जाताना पोहचण्याआधीच केस होतात फ्रिझी? ५ मिनिटांची तयारी आणि दिवसभर केस राहतील सुंदर आणि व्यवस्थित

कुठेही जाताना पोहचण्याआधीच केस होतात फ्रिझी? ५ मिनिटांची तयारी आणि दिवसभर केस राहतील सुंदर आणि व्यवस्थित

घरून तयार होऊन बाहेर जाताना केस अगदी नीट, सरळ आणि सुंदर दिसतात. पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वारा, घाम किंवा ओलसर वातावरणामुळे केस फुगून, विस्कटून खराब होतात किंवा कोरडे दिसू लागतात. ही समस्या जवळजवळ सर्वांचीच आहे. (Does your hair get frizzy? 5 minutes of preparation and your hair will stay beautiful and well-groomed all day long.)केस व्यवस्थित बसलेले ठेवण्यासाठी केवळ हेअरस्टाइल पुरेशी नसते, तर योग्य तयारी, थोडेसे संरक्षण आणि काही साध्या ट्रिक्स केल्या तर केस तासनतास नीट राहू शकतात.

केस सरळ राहावेत, त्यात उगाच फुगवटा किंवा फ्रिझ येऊ नये यासाठी सुरुवातच योग्य प्रकारे धुण्यापासून व्हायला हवी. अतिशय गरम पाणी टाळून कोमट पाण्यात केस धुतले की त्यांच्या क्युटिकल्स बंद राहतात आणि केस कमी फुगतात. धुतल्यावर थंड पाण्याचा शिडकावा केल्याने केस अधिक स्मूद राहतात. केस कोरडे करताना घाईघाईने टॉवेलने पुसण्यापेक्षा हलक्या हाताने दाबून पाणी काढावे. यामुळे फ्रिझ बरीच कमी होते. बाहेर जाण्याआधी थोडेसे हलके सीरम किंवा अँटी-फ्रिझ क्रीम लावल्याने केसांचा पोत जास्त वेळ टिकतो.

घरच्या घरी तयार करून वापरता येणारा एक साधा पॅकही केस नीट बसण्यासाठी मदत करतो. दही आणि कोरफड एकत्र करून त्यात थोडंसं बदाम तेल घातलं की एक उत्तम स्मूदिंग पॅक तयार होतो. हा पॅक केसांना थंडावा देतो, ओलावा कायम ठेवतो आणि केसातील गुंता, विस्कटलेले केस किंवा शुष्कपणा कमी करतो. आठवड्यातून एकदा हा पॅक लावल्याने सरळ, मोकळे आणि सहज सांभाळता येणारे केस मिळतात.

हेअरस्टाइल निवडताना हवामान लक्षात घेणे उपयोगी ठरते. केस पूर्ण मोकळे ठेवायचे असतील तर हेडबण्ड, मिनी क्लिप्स किंवा हलकासा हेअरस्प्रे खूप मदत करतो. सरळ केसांना स्टाइल टिकवून ठेवण्यासाठी लो पोनीटेल, स्लिक बन किंवा नीट घातलेली वेणीही उत्तम पर्याय आहेत. या हेअरस्टाइल वाऱ्यात, प्रवासात किंवा घामातही विस्कटत नाहीत. केस मोकळे ठेवायचे असले तरी पुढचे काही बट्स पिनने सेट करून ठेवले की लुक संपूर्ण वेळ नीट राहतो.

जर बाहेर पडताना खूप वारा, ओलसर वातावरण किंवा वाहनातील प्रवास करणार असेल, तर केसांना प्रोटेक्शन टाइम द्यावा. केस मागे घेऊन हलक्या स्कार्फने बांधणे, सिल्कच्या कपड्याचा वापर करणे किंवा क्लचरने हलकेच केस बांधल्याने  केस अडकत नाहीत, फुगत नाहीत आणि गुंतत नाहीत. पोहोचल्यानंतर हे स्कार्फ किंवा क्लिप काढली की केस अगदी सरळ आणि व्यवस्थित दिसतात.
 

Web Title : फ्रिज़ी बालों का समाधान: पूरे दिन के स्टाइल के लिए 5 मिनट की तैयारी

Web Summary : फ्रिज़ी बालों को मात दें! ठंडे पानी से सही धुलाई तकनीकों से शुरुआत करें। चिकने बालों के लिए दही, एलोवेरा और बादाम के तेल का सीरम, घरेलू पैक का उपयोग करें। हेडबैंड, लो पोनीटेल और सुरक्षा के लिए स्कार्फ का उपयोग करके स्मार्ट तरीके से स्टाइल करें।

Web Title : Frizzy Hair Fix: 5-Minute Prep for All-Day Style

Web Summary : Beat frizzy hair! Start with proper washing techniques using cool water. Use serum, homemade packs of yogurt, aloe vera, and almond oil for smooth strands. Style smartly using headbands, low ponytails, and scarves for protection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.